डोंबिवली पश्चिम येथे पीडित महिला आपल्या नवऱ्यासोबत राहते. काही कारणामुळे तिने राहते घर सोडण्याच्या तयारी केली आणि तिने तिचे सामान तिच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. १७ सप्टेंबरच्या संध्याकाळी ती महिला आणि तिचा नवरा हे सामान घेण्यासाठी गेले असता या दोघांचा मित्र दिनेश आणि त्याचा साथीदार सुनिल हे दोघे घरी होते. या दोघांनी त्या महिलेच्या नवऱ्याला दारु आणण्याकरीता सांगितले आणि तो दारु आणण्यासाठी तिथून निघून गेला.
महिलेच्या नवऱ्याला दारु आणण्यासाठी पाठवून दोघांनी महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेत घडली आहे. विष्णूनगर पोलिसांनी दोघांपैकी एक आरोपी दिनेश याला अटक केली आहे, तर दिनेशचा साथीदार सुनिल याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
या दोघांच्या ओळखीचे दिनेश गडारी आणि सुनिल राठोड हे दोघे घरी होते. या दोघांनी पिडीत महिलेच्या पतीला दारु आणण्याकरिता सांगितले. तिचा पती दारू आणण्यासाठी निघून गेला. तरुणी एकटीच घरी होती. याचा फायदा घेत दिनेश गडारी याने तरुणीवर बलात्कार केला. ती कशीबशी घराबाहेर निघाली आणि पळू लागली.
तिचा पाठलाग करुन दिनेश गडारी याचा मित्र सुनील राठोड याने तिला एका रिक्षात कोंबले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिला मदतीची याचना करीत होती. मात्र, सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीतील नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. पीडित महिलेचा पती दारू घेऊन मित्राच्या घरी परतला तेव्हा तिने पतीला तिच्यावर झालेल्या बलात्काराची माहिती दिली.
पोलीस ठाण्यात पीडितेची तक्रार
आरोपींना कायद्याची भीती राहिली नाही. त्यांनी पतीसमोरच पीडितेवर अश्लील चाळे केले. पीडित महिलेच्या पतीला मारहाण करत त्याला देखील एका घरामध्ये डांबून ठेवण्यात आले. ही घटना झाल्याच्या नंतर आरोपींनी या दोघांना पोलीस स्टेशनला किंवा कुठे वाच्यता केली तर जीवे ठार मारण्याची धमकी देत तिथून पिटाळून लावले. मात्र कसेबसे पीडित कुटुंब डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस स्टेशनला पोहोचले आणि या घटनेची हकीकत पोलिसांना सांगितली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा