कांद्यावरील निर्यातमूल्य रद्द करावे तसेच इतर मागण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या आठ दिवसापासून संप पुकारल्याने जिल्ह्यातील १७ बाजार समितीचे कांदा लिलाव ठप्प झाले होते. मात्र आज नवव्या दिवशी विंचूर इथे हे लिलाव पुन्हा सुरू झाले आहेत.
यासंदर्भात पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नव्हता. दरम्यान, शेतकऱ्यांचा कांदा चाळीत सडत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्यांची होणारी कोंडी लक्षात घेता लासलगावच्या विंचूर येथील उपबाजार समितीने कांदा लिलावला सुरुवात केली. लिलाव सुरू झाल्याने शेतकरी ३०० ते ४०० वाहनांमधून मोठ्या संख्येने कांदा विक्रीला घेऊन आले होते.
कांद्याला जास्तीत जास्त २४०० तर सरासरी २००० ते २१०० रुपये भाव मिळाला. ८ दिवसांच्या कोंडी नंतर कांदा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा