BREAKING NEWS
latest

देशात इथेनॉल अर्थव्यवस्था २ लाख कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट - नितीन गडकरी

प्रतिनिधी: अवधूत सावंत

देशात कृषी विकासाचा ६ टक्के दर गाठण्याला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उत्पादन घेण्यावर भर देत आहेत. इथेनॉल अर्थव्यवस्था २ लाख कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट आहे. जगातील पहिले बीएस-६ कॉम्प्लायंट फ्लेक्स फ्युएल स्ट्राँग हायब्रीड वाहन दिल्लीत सुरु केले जाईल, फ्लेक्स इंजिन १०० टक्के इथेनॉलवर चालतील आणि अर्थव्यवस्थेसाठी होणारी बचत १ लाख कोटींच्या पुढे जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. पानिपतमधील आयओसीएल संयंत्र तांदळाच्या पेंढ्यासारख्या शेतीतील कचऱ्याचे रूपांतर इथेनॉल आणि जैव बिट्युमेनमध्ये करते, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

जैव-इथेनॉल उत्पादन तंत्रज्ञानातील प्रगतीचा विचार केला तर १ टन तांदूळ अंदाजे ४०० ते ४५० लिटर इथेनॉल उत्पादित करू शकतो. हे शाश्वत आणि ऊर्जा स्वातंत्र्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगतीचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले. भविष्यात भारतात ५ % इथेनॉल मिश्रण वाढवण्याच्या संभाव्य योजनांसह १ % शाश्वत विमान इंधन वापरण्याचे आदेश २०२५ पर्यंत देण्यात येतील.

इंडियन ऑइल पानिपतमध्ये ८७ हजार टन शाश्वत विमान इंधनाचे उत्पादन करण्याची क्षमता असलेले संयंत्र स्थापन करत आहे, असे गडकरी यांनी सांगितले. भारतात दूरसंचार क्षेत्रात सुमारे ६ लाख मोबाइल टॉवर्स कार्यरत आहेत. पारंपरिकपणे, हे टॉवर्स विजेसाठी डिझेलवर चालणाऱ्या जनित्र संचावर अवलंबून आहेत. एका टॉवरला वर्षाला सुमारे ८ हजार लीटर डिझेल लागते, असे गडकरी यांनी बोलताना  सांगितले.

यामुळे एकूण २५ हजार कोटी रुपये किंमतीच्या २५० कोटी लिटर डिझेलचा दरवर्षी प्रचंड वापर होतो. या जनित्र संचांसाठी इंधन म्हणून इथेनॉलचे मिश्रण डिझेलला एक शाश्वत पर्याय देते आणि याआधीच १०० टक्के इथेनॉलवर चालणारा जनित्र संच विकसित करण्यात आला आहे, असे गडकरी यांनी सांगितले. आगामी काळात केवळ इथेनॉल आधारित जनित्र चालवण्यासाठी जेनसेट उद्योगाला पाठबळ देत असल्याचे ते म्हणाले. हायड्रोजन हे भविष्यासाठीचे इंधन आहे आणि याद्वारे भारत ऊर्जेचा निव्वळ निर्यातदार बनू शकतो, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत