नेहमी गोरगरीब जनतेच्या कामाला प्राधान्य देणारे तसेच आपल्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे प्रश्न सोडवून सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे असे 'महावितरण'चे नेवासा येथील तत्कालीन उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांना भानसहिवरे येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
सर्व जाती - धर्मांच्या घटकांना सोबत घेऊन परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी भानसहिवरा येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठान अग्रेसर समजले जाते. सामाजिक प्रश्नांवर प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करून न्याय मिळवून देण्यासाठीही प्रतिष्ठान ओळखले जाते. लोकांच्या अडीअडचणीत त्यांना मदत करण्यासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी नेहमीच आग्रही असल्याचे दिसून आले आहे. अनाथ घटकांना दर दिवाळीला स्वखर्चाने कपडे व किराणा या प्रतिष्ठानच्या वतीने दिला जातो. कोरोना महामारीत गावातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस कष्ट घेतले. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त विविध लोकोपयोगी उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविले जातात. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण होऊन शिस्त लागण्यासाठी प्रतिष्ठानने गावातील सर्व शाळांना कचरा कुंड्या बसवून दिल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी तसेच बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठान झटत असते. हरिनाम सप्ताह सारख्या धार्मिक उपक्रमांत सहभागी भाविकांना विविध धार्मिक ग्रंथ प्रतिष्ठानच्या वतीने भेट देण्यात येतात. गावातील सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी प्रतिष्ठान नेहमीच प्रयत्नशील असते. गरीब व गरजू रुग्णांना माफक दरात रुग्णालयात जाण्यायेण्यासाठी ना नफा ना तोटा धर्तीवर रुग्णवाहिका सेवा लवकरच उपलब्ध करून देण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे.
२०२० पासून प्रतिष्ठानने विविध क्षेत्रात उल्लेखनीय लोकाभिमुख कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मातोश्री स्व. द्वारकाबाई मारुतराव मोहिते पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा महावितरणच्या नेवासा येथील तत्कालीन उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांच्यासह कृषी सहायक कुमार गर्जे, करजगाव येथील प्रयोगशील शेतकरी कैलास शिंदे, प्रयोगशील प्राथमिक शिक्षिका श्रीमती निताताई आनंदकर, गुणवंत शिक्षिका श्रीमती वर्षाताई शेटे, सलाबतपुर येथील उर्दू शाळेतील पदवीधर शिक्षक फय्याज शेख, भानसहिवरे येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. जगन्नाथ नरवडे, नेवासा येथील पशुवैद्यकीय व्रनोपाचारक शिवाजी सोनवणे, राज्य कबड्डी पंच श्रीमती मनिषाताई धानापूने, शेवगाव येथील पत्रकार शहाराम आगळे, आदर्श माता पिता अशोक व रंजना पेहेरकर यांना समाजभूषण पुरस्काराने हांडिनिमगाव येथील त्रिवेनीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंद गिरी महाराज, नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल राव लंघे यांच्या हस्ते तसेच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
यावेळी नेवासा पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, अंकुश काळे, जनार्दन जाधव, ज्ञानेश्र्वर पेचे, अंबादास कोरडे, आशाताई मुरकुटे, देवीदास साळुंके, जयवंत मोटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मोहीते यांनी शेवटी उपस्थितांचेआभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा