BREAKING NEWS
latest

'दिपेश म्हात्रे फाऊंडेशन'च्या दहीहंडी उत्सवात गतिमंद मुलांच्या गोविंदा पथकाचा पहिला मान तसेच 'महाबली बजरंग बली' धार्मिक कार्यक्रम होणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  डोंबिवली पश्चिम येथील सम्राट चौकात दरवर्षी प्रमाणे 'दिपेश म्हात्रे फाऊंडेशन' च्या माध्यमातून  होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातुन 'क्षितिज' संचालित गतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थी सकाळी ११ वाजता गतिमंद दहीहंडी फोडणार आहेत. या मुलांसाठी सुरक्षा उपाय म्हणून सेफ्टी हार्णेस व एम्ब्युलेन्स सुद्धा ठेवण्यात आली आहे. तसेच शहरातील तरुणाईला आकर्षित करण्यासाठी यंदा शहरातील प्रमुख रस्त्यावर चौकात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासह लाखो रुपयांच्या बक्षिसाच्या दही हंडी उभारण्याचे आयोजन केल्याने यंदा दही हंडी मंडळावर बक्षिसांची खैरात केली जाणार असल्याचे दिसून येत आहे. 


  डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचे युवा नेतेपदी सचिव 'दिपेश म्हात्रे फाऊंडेशन'च्या माध्यमातून लाखो रुपयांच्या पारितोषिक असलेले लाख मोलाची दही हंडी उभारण्यात आली आहे. यानिमित्ताने डोंबिवलीत
पहिल्यांदा 'महा बली बजरंग बली' असा धार्मिक कार्यक्रम होणार असून अनेक सामाजिक संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे अशी माहिती युवासेने चे सचिव दीपेश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना पत्रकार परिषदेत दिली. 

  डोंबिवली पश्चिमेकडे कडील सम्राट चौकात होणाऱ्या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आवर्जून उपस्थित राहणार असल्याचेही प्रसिध्दी माध्यमांना सांगण्यात आले. या दही हंडी उत्सवात पहिले पारितोषिक १ लाख रुपये तर महिला गोविंदा पथकास ५१ हजार तर इतर गोविंद पथकास अनेक पारितोषिक असे एकूण १५ लाख रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहे. यावेळी फिरते रुग्णवाहिकेची सोय केली जाणार असून विशेष उपस्थिती म्हणून गायक आनंद शिंदे व मराठी अभिनेते संतोष जुईकर यांच्याबरोबर अनेक सेलिब्रेटी या दहीहंडी उत्सवात हजेरी लावणार आहेत.
« PREV
NEXT »

1 टिप्पणी