दिनांक ३१/०८/२०२३ रोजी सायंकाळी ०५:०० वा. डोंबिवली पूर्व कडील शॉप न ७, आंबामाता को.हौ.सोसायटी, नेहरू रोड येथील 'प्रगती ज्वेलर्स' येथुन फिर्यादी बसंतीलाल रतनलाल चपलोत (वय: ६६ वर्षे) व्यवसाय- ज्वेलर्स व्यापार यांनी त्यांचे दुकानात काम करणारा नोकर विक्रम गोपाळ रावल (वय: २८ वर्षे) याच्याकडे एकूण १२,७२,०००/- रुपये किंमतीचे दागिणे हॉलमार्क करण्यासाठी विश्वासाने दिले असता तो ते दागिने घेऊन पळुन गेला म्हणून त्यांच्या तक्रारीवरून डोंबिवली पोलीस ठाणे येथे रजि क्र. ३१९/२०२३ कलम ४०८ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल केला.
सदर गुन्हयाचा तपास करीत असताना डोंबिवली पोलीस ठाण्याचे सपोनि. योगेश सानप, पोउपनि. धोंडे, पोहवा. विशाल वाघ, सरनाईक, पोअं.सांगळे, पाटील यांनी गुन्ह्याचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन तसेच तांत्रिक मदतीच्या आधारे त्याचा पाठलाग करुन, उपलब्ध स्टाफच्या मदतीने आरोपी विक्रम गोपाळ रावल याला ठाकुर्ली रेल्वे स्टेशन येथून अवघ्या ३ तासात ताब्यात घेवुन अटक करुन त्यांच्याकडुन १२,७२,०००/- रुपये कींमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. जप्त मुददेमाल:- १) ९,१८,०००/- रु. किंमतीच्या सोन्याच्या ७ बंगडया, २) १,४४,०००/- रु. किंमतीचे एक बॉक्स आकाराची २४ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ३) २,१०,०००/- रु. किंमतीची एक ३५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी असा एकूण १२,७२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कामगिरी मा अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग दत्तात्रय शिंदे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ - ३. कल्याण चे सचिन गुंजाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोउपनि अजिंक्य धोंडे, पोहवा. विशाल वाघ, सरनाईक, कुरणे, पोअं. पाटील, नितीन सांगळे, पोटे, पोहवा. निसार पिंजारी कोळसेवाडी पो.ठाणे यांनी कामगिरी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा