BREAKING NEWS
latest

राहुल गांधी सुतार काम शिकत तयार केली खुर्ची..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या सर्वसामान्य कामगार आणि कारागीर वर्गाच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांनी नवी दिल्ली येथील 'कीर्तीनगर फर्निचर मार्केट' मध्ये सुतार कारागीरांची भेट घेत, त्यांच्याकडून सुतारकामाचे प्रशिक्षण घेतले. येथे राहुल गांधी सुतार कामगारांकडून खुर्ची बनवायला शिकले. त्यांनी लाकडावर करवत आणि प्लॅनरचा वापर केला. कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांचीही परिस्थिती जाणून घेतली.
राहुल गांधींच्या या भेटीचा व्हिडिओ काँग्रेसने सोशल मीडियावर शेअर केला आहे. राहुल गांधी 'भारत जोडो' यात्रेपासून सातत्याने कामगार आणि मजुरांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. एप्रिलपासून त्यांची ही मालिका सुरू झाली आहे.

दरम्यान मागील आठवड्यात त्यांनी हमालांची भेट घेतली होती. त्यावेळी चाकं असलेली खुर्ची डोक्यावर घेतलेला फोटो शेअर केल्यामुळे सोशल मिडियावर राहुल गांधी यांना ट्रोल करण्यात आले होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत