BREAKING NEWS
latest

भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या संघटित विरोधामुळे भुमीअभिलेख कक्षाकडून परस्पर होणारी जमीन मोजणी स्थगित..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

  डोंबिवलीतील मौजे दावडी येथील सर्व्हे क्र. ५,६,७,८,९,१०,११,१२,१३,११३,११५,११६,११८,११९,१२४,१२५ चा सर्व्हे बिल्डर अजय प्रताप अशर याने भूमिलेख खात्याकडून सोबत पोलीस बळ घेत परस्पर सर्व्हे करण्याचे योजिले असल्याची माहिती तेथील भूमिपुत्र शेतकऱ्यांना माहिती पडताच तेथे सगळे भूमिपुत्र शेतकरी संघटित होऊन त्या सर्व्हेस विरोध केला व तेथे तणावाचे वातावरण झाले. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संरक्षित कुळ १९३२ च्या पूर्वीपासून दप्तरी दाखल असून वडिलोपार्जित ५-६ पिढ्या त्यावर गेलेल्या असून जवळपास ३०० वर्षांपासून कब्जा वहिवाटीनुसार सदर जमीन आमच्या ताब्यात असून आणि भूमिअभिलेख यांना वेळोवेळी अर्ज तसेच निवेदनं देऊन हरकती घेत असून आमच्या कुठल्याही हरकतीवर योग्य सुनावणी न घेता परस्पर बिल्डरशी हातमिळवणी करून  मोजणी चा दबाव २०१६ पासून आणला जात आहे असे तेथील स्थानिक भूमिपुत्र शेतकरी जितेंद्र ठाकूर, महेंद्र म्हात्रे, नवनीत म्हात्रे, हरी जोशी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
सुपारी घेऊन कारस्थान रचल्याचा आरोप

वारंवार मे.आशर रियलटर्सचे भागिदार अजय प्रताप आशर व जतिन देसारिया यांच्या कडून आमच्या वर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संत सावळाराम महाराज अभयारण्य दावडी, उंब्राली यांच्या पायथ्याशी कसत असलेली जमिन सोनारपाडा येथील मुळनिवासी भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या कुळ-कब्जा वहिवाटीत कसत असलेल्या जमीनी मौजे.दावडी, ता.कल्याण, जि.ठाणे ज्याचे सुरक्षित कुळांच्या जमीनीचे एकूण क्षेत्रफळ ८०,७१ एकर जमीन परस्पर मोजणी करून आम्हांला भूमिहीन करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आमचा या मोजणीला विरोध असून या दाबावतंत्राला बळ देण्याचे काम 'हॅपी होम' चे विकासक प्रफुल शाह आणि काँग्रेसचे संतोष केणे जे 'शेतकरी संघर्ष समिती'चे सल्लागार आहेत त्यांनी सुपारी घेऊन कारस्थान रचल्याचा आरोप जितेंद्र ठाकूर यांनी केला. त्यावर संतोष केणे यांची या आरोपावर प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला असता त्यांचे जिल्ह्यात दौरे असल्याने ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

'मेसर्स आशर रियलटर्स' वर नक्की वरदहस्त कोणाचा ?

या प्रकरणात आम्ही ८० वर्ष कष्ट केलेले जवळपास ३०० ते ४०० शेतकरी आहोत. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या गरजेपोटी आपली शेतजमीन विकलीही असेल त्यावर कोणालाही त्यांनी त्यांची जमीन विकण्यास आमचा विरोध नाही पण सरकारी सर्व्हे ला आमचा कट्टर विरोध आहे कारण आमची जमीन ही एकत्रित असून एका सर्व्हे क्रमांकात ६-७ शेतकरी आहेत व शेतीची हिस्से मोल अद्याप झाली नसून त्यामुळे तो शेतकरी त्याचा हिस्सा विकला तर तो कुठला विकतो हे आमच्या निदर्शनात येणार नाही तसेच त्याच्या कब्जा वाहिवाटीतील ज्यांना कोणाला त्यांची जमीन ज्या कोणाला विकायची असेल तर तो शेतकरी स्वतंत्र आहे व आमची काहीच हरकत नाही. आमची जमीन आम्ही जोवर न्यायालयात न्यायासाठी भांडत आहोत व महसूल खात्याशी निगडित शेतकऱ्यांचे ५९ दावे अजून उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट प्रलंबीत असूताना मोजणी केली जाऊ नये तसेच बिल्डर अजय प्रताप आशर ने न्यायालयात मोजणी साठी अर्ज करून तो दिवानी आणि जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला असून उच्च न्यायालयात प्रलंबित असून आमच्या दाव्यांचा न्यायनिवाडा न होता हा सर्व्हे लावला जातोच कसा ? असा प्रश्न स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांनी उपस्थित केला. तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या कडे शेतकऱ्यांतर्फे दावा क्र.१३/२०१६ दाखल करण्यात आला असून  त्यामध्ये जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दि.२१/११/२०१६ रोजी प्रांत उपविभागीय अधिकारी मा.उकिरडे यांनी फेरफार मध्ये कुठलेही फेरबदल करू नये असे आदेश पारित केलेला असतानाही अमित सानप तत्कालीन तहसीलदार कल्याण, तत्कालीन मंडळ अधिकारी, तत्कालीन तलाठी दावडी, यांनी आर्थिक लालसेपोटी आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर पणे आदेश देऊन व फेरफार मंजूर करून त्यावर अंमल करून आदेशालाही केराची टोपली दाखवली आहे व आमच्यावर अन्याय केला गेला आहे हे लक्षात आल्यामुळे आम्ही शेतकरी भूमिहीन व उपाशी मरण्यापेक्षा अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करून मेलेले बरे, यासाठीच होत असलेल्या जमीन मोजणीस आम्ही स्थानिक भूमिपुत्र शेतकरी विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने संघटीत जमून हरकत घेत आहोत व विरोध करीत आहोत. आमदार, खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री इकडचेच ठाणे जिल्ह्यातील असून आमच्यावर लढायची वेळ येतेच कशी व याचा सूत्रधार कोण तसेच सदर 'मेसर्स आशर रियलटर्स' वर नक्की वरदहस्त कोणाचा ? असा खडा सवाल स्थानिक भूमिपुत्र शेतकरी जितेंद्र ठाकूर, महेंद्र म्हात्रे, नवनीत म्हात्रे, हरी जोशी, गणेश केणे, रवींद्र म्हात्रे, दिलीप ठाकूर, संतोष म्हात्रे व पिंटू म्हात्रे यांनी उपस्थित पत्रकारांसमोर केला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत