BREAKING NEWS
latest

डोंबवलीत 'रास रंग दांडिया फेस्टिवल 'चे डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

डोंबिवली पूर्वेला डीएनसी शाळेच्या मोकळ्या पटांगणात  दि.१४ ते २३ ऑक्टोबर 'डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व नवदुर्गा युवा मंडळ' तर्फे भव्य 'रास रंग दांडीया फेस्टिवल २०२३' चे आयोजन करण्यात आले असून कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या सोहळ्याचे ५००० भगवे फुगे आकाशात सोडून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली.
. डोंबिवली शहरात प्रथमच प्रसिद्ध दांडीया किंग नैतिक नागदा व त्याच्या बँड पथकाचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. डोंबिवली पूर्व येथील डीएनसी शाळेच्या पटांगणात या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दि. १५ ते २३ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या रास रंग दांडिया फेस्टिव्हल मध्ये विविध कलाकारांची, सीनेअभिनेते, राजकीय नेत्यांची मांदियाळी यावेळी पाहायला मिळणार असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा विशेष सन्मानही या फेस्टिवल दरम्यान करण्यात येणार आहे. नवरात्र उत्सव म्हणजे नारी शक्तीची ओळख मानली जाते. या पार्श्वभूमीवर महिलांसाठी भोंडला तसेच कुमारिकांसाठी कुंकूमार्चन व कुमारीका पूजनाचे आयोजन केले आहे. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नऊ नारी शक्तींचा सन्मानही या सोहळ्या दरम्यान करण्यात येणार आहे. 

माननीय मुख्यमंत्र्यांना अजून लोकोपयोगी कामे करण्याची शक्ती द्यावी व देवीच्या प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचण्याचे काम  सरकारद्वारे करत असताना त्यासाठी आशीर्वाद द्यावा असे मागणे देवीकडे केल्याचे डॉ श्रीकांत शिंदे यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. त्याच प्रमाणे 'रास रंग २०२३' ला लोकांकडून मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहून त्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ चे सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभागाचे सुनील कुराडे, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, शिवसेना शहप्रमुख राजेश मोरे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, अभिजित दरेकर, संजय पावशे,भाऊ चौधरी, रवी मट्या पाटील, नितीन मट्या पाटील, जनार्धन म्हात्रे, राहुल म्हात्रे, गोरखनाथ म्हात्रे, ऍड.गणेश पाटील, जितेन पाटील, माजी महापौर विनिता विश्वनाथ राणे, सागर जेधे तसेच इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत