BREAKING NEWS
latest

चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करून फरार झालेल्या सराईत ४ गुन्हेगारांना गुन्हे शाखा, घटक - ३ कल्याण यांनी केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

फिर्यादी नामे विशाल अशोक गुप्ता रा. कोणगांव भिवंडी हे दि. ०९/१०/२०२३ रोजी ०४:३५ वा. चे सुमारास चोळेगांव, ठाकुर्ली पूर्व येथील सार्वजनीक रोडवर त्यांचे मोबाईल फोन मध्ये ओला पार्टनर ऍपवर आलेल्या मेसेज प्रमाणे पॅसेंजरला पिकअप करण्याकरीता गेले असताना आरोपी नामे १) आकाश दिनेश सिंग २) राहुल भरत जगताप ३) गौरव अरुणकुमार गौड ४) सनी ऋषीपाल तुसांबर यांनी व त्यांचे अन्य दोन साथीदारांनी मिळून आपसात संगनमत करून फिर्यादी यांना चाकुचा धाक दाखवून दमदाटी करून त्यांचे जवळील ३७,९९९/- रूपये किंमतीचा 'विव्हो व्ही २७ प्रो' मोबाईल फोन, २००/- रूपये रोख रक्कम, १०००/- रूपये किंमतीचे चांदीचे पैंजण असा एकूण ३९,९९९/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने काढून घेतले बाबत डोंबिवली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं ३८३/२०२३ भादंवि कलम ३२६, ५०४ आणि ३८५/२०२३ भादंवि कलम ३९२, ५०६ (२), ३४ प्रमाणे दि. १२/१०/२०२३ रोजी दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असताना दि. १३/१०/२०२३ रोजी पोलीस अंमलदार सचिन वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोउपनि संजय माळी व पथकाने सापळा रचुन त्रिमूर्तीनगर, डोंबिवली पूर्व येथे इसम नामे 
१) आकाश दिनेश सिंग (वय: २० वर्षे) रा. मंगेश चाळ, ९० फुट रोड, खंबाळपाडा डोंबिवली पुर्व, 
२) राहुल भरत जगताप (वय: २० वर्षे) रा. शेलार चाळ, त्रिमूर्तीनगर, तुळजाभवानी मंदिरा जवळ, शेलार नाका, डोंबिवली पूर्व, 
३) गौरव अरुणकुमार गौड (वय: १७ वर्षे) (विधी संघर्षीत बालक) रा. संतवाडी, ठाकुर्ली डोबिवली पूर्व, 
४) सनी ऋषीपाल तुसांबर (वय: १८ वर्षे) रा. वाल्मीकी वस्ती, शेलार चौक, त्रिमुर्ती नगर, डोंबिवली पूर्व यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत ताब्यात घेतले आहे. तसेच सदर इसमांकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल ३७,९९९/- रूपये किंमतीचा 'विव्हो व्ही २७ प्रो' मोबाईल फोन हस्तगत केला आहे.

सदर कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पंजाबराव उगले, मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे), शिवराज पाटील, मा.सहा.पोलीस आयुक्त, निलेश सोनावणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक - ३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोलीस उप निरीक्षक संजय माळी, पोहवा. अनुप कामत, पो.ना. सचिन वानखेडे, पो.कॉ. विनोद चन्ने, पो.कॉ. विजेंद्र नवसारे, म.पो.हवा. जोत्सना कुंभारे यांनी यशस्वीरीत्या केली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत