BREAKING NEWS
latest

दिवा रेल्वे स्थानकात संतप्त कोकण प्रवाश्यांनी केला रेल रोको..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

मध्य रेल्वेच्या हद्दीत पनवेल जवळ शनिवारी मालगाडीच्या अपघातामुळे रविवारी दुसऱ्या दिवशी देखील कोकण रेल्वे मार्गात धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रविवारी सकाळी दिवा स्थानक परिसरात रेल रोको केला.

मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर येणारी मांडवी, एलटीटी मंगळूर स्पेशल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या या कल्याण, मिरज मार्गे वळवण्यात आल्या आहेत. अन्य मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये सीएसएमटी- मंगळूर तसेच मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. मात्र दिव्या वरून कोकणाकडे जाणाऱ्या काही गाड्या रेल्वे ट्रॅक वरच उभ्या असून यात अनेक प्रवासी कालपासून बसून आहेत. या प्रवाश्यांना खाण्याची तसेच पाणी पिण्याची सोय नसल्याने हे प्रवासी संतप्त झाले होते.


त्याचबरोबर त्यामार्गावरील रेल्वे सेवा चालू होणार नव्हती तर मग आम्हाला तिकीट का दिली ? असा सवालही यावेळी संतप्त नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला केला. आम्ही आदल्या रात्री पासून रांगेत उभे आहोत त्याच वेळी रेल्वेने आम्हाला सांगायला हवे होते अशी व्यथा प्रवाश्यांनी मांडली. त्यामुळेच संतप्त प्रवाश्यांनी दिवा रेल्वे स्टेशनवर रेल रोको केला होता.

जीआरपी पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती परिणामी लोकल गाड्या पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत होत्या.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत