डोंबिवली पश्चिम येथील नामांकित असलेल्या 'जाह्णवीज मल्टी फाउंडेशन'चे जन गण मन इंग्लिश सेकंडरी स्कूल, जन गण मन विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज तसेच वंदे मातरम डिग्री महाविद्यालय मधुबन बँक्वेट हॉल मध्ये दि. २१/१०/२०२३ सप्तमी रोजी सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर, श्लोकांचे पठण, नवकन्या पूजन, भगवान बालाजी तसेच मातृ-पितृ यांचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी आणि पालक यांचे उपस्थिती शेकडोंच्या संख्येत होती.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी ध्यानधारणा घेऊन नवदुर्गांचे स्मरण करणे आणि परमेश्वराचे चिंतन करणे मानसिक आणि शौर्य शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे असे सांगितले. संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे मॅडम तसेच संस्थेच्या कोषाध्यक्षा कु.जाह्णवी राजकुमार कोल्हे याही उपस्थित होत्या. त्यांनी हे नवदुर्गांचे पूजन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग जातीने उपस्थित होता. परमेश्वराचा आशीर्वाद असल्याशिवाय आपण कोणतेही कार्य करू शकत नाही याचा सतत स्मरण आपल्याला असणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती ही पूजनाची संस्कृती आहे अश्विनी नवरात्रीला तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. या मंगल प्रसंगी देवी देवतांचे आशीर्वाद घेऊन आपले जीवन आपण सुखकर करू शकतो असे भावनाही मांडण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी गरबा आणि दांडिया खेळण्याचा ही आनंद लूटला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री.एकनाथ चौधरी सर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा