BREAKING NEWS
latest

सनातन धर्मविरोधी उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करा ! पणजी येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

  पणजी :  राज्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आझाद मैदान, पणजी येथे आंदोलन करताना तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, खासदार ए. राजा आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह विधान केल्याने समाजामध्ये धार्मिक तेढ आणि संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तिघांच्या विरोधात ‘हेट स्पीच’ केल्याच्या प्रकरणी गुन्हे प्रविष्ट करावे. द्वेषमूलक विधाने (हेट स्पीच) करणार्‍यांना घटनात्मक पदांवर रहाण्याचा अधिकार नसल्याने त्यांना विधीमंडळ आणि संसद येथून बडतर्फ करावे, अशा मागण्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आझाद मैदान, पणजी येथे २१ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी राष्ट्रीय हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून केल्या.

प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. युवराज गावकर यांनी आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी उपस्थितांना संबोधित केले. यामधून पुढील सूर उमटला. आज हिंदुविरोधी लोक धर्मनिरपेक्षतेच्या आडून आणि ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’च्या नावाखाली हिंदु धर्मावर आसूड ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे, खासदार ए. राजा हे ‘सनातन धर्मा’ची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स, कुष्ठरोग आदी रोगांशी तुलना करून ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची भाषा करत आहेत. बहुसंख्य हिंदु समाजाच्या धार्मिक श्रद्धेवर घाला घातला जात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी केले.

आंदोलनामध्ये सहभागी संघटना 
भारत माता की जय, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय हिंदु युवावाहिनी, गोमंतक मंदिर महासंघ, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा.

आंदोलनाला संबोधित केलेले वक्ते 
श्री. संदीप पाळणी (भारत माता की जय संघटना), श्री. अभिषेक बोरकर (बजरंग दल) आणि श्री. प्रवीण चौधरी (हिंदुत्वनिष्ठ, वास्को)

संपादकीय भूमिका
अशी मागणी का करावी लागते ? अन्य धर्मियांच्या संदर्भात हिंदूंनी अशी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्यावर प्रशासन त्याला अभिव्यक्तीस्वातंत्र्य ठरवून मोकळीक देणार का ?
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत