BREAKING NEWS
latest

समृध्दी महामार्गावरील भीषण अपघातात बारा जणांचा मृत्यू..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
छत्रपती संभाजी नगरच्या समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झाला असून अपघातात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यात काही लहान बालकांचा देखील समावेश आहे. सैलानी येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला असल्याचे कळत आहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली.

रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. जांबरगाव टोलनाक्याजवळ एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात बारा जणांचा जागीच मृत्यू झाल. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परतत असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

या अपघातात मृत व्यक्तींमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. हे सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. ट्रॅव्हल्समध्ये एकूण ३० जण प्रवास करत होते. हे सर्वजण बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्ग्याचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता.

अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात आली. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, घटनास्थळी समृद्धी महामार्गावरील बचाव पथक, वैजापूर पोलीस देखील दाखल झाले होते. काही महिला देखील या अपघातात मृत्यू पावल्याचे समजले आहे. तर सर्व जखमी अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत