साने गुरुजी लिखित ‘श्यामची आई’ या अजरामर साहित्यकृतीवर आधारित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक सुजय सुनील डहाके यांनी नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लाँच केले. अमृता अरुण राव या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अभिनेता ओम भूतकर या चित्रपटात महत्त्वाची साने गुरुजींची भूमिका साकारत आहे. शार्व गाडगीळ बालकलाकार भूमिका साकारणार आहे. त्याशिवाय सिनेमात सारंग साठ्ये, गौरी देशपांडे, मयूर मोरे, सुनिल अभ्यंकर, उर्मिला जगताप, संदीप पाठक अशी जबरदस्त स्टारकास्ट करण्यात आली आहे.
अमृता अरुण राव यांनी आजवर अनेक सामाजिक विषयांवरील चित्रपटांची निर्मिती केली आहे. अनेक पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाके या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर साने गुरुजी लिखित 'श्यामची आई' सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून अनेक कलाकार या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सिनेमात साने गुरुजींची भूमिका कोण साकारणार याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर अभिनेता ओम भूतकर सिनेमात साने गुरुजींची व्यक्तीरेखा साकारणार असल्याचं समोर आलं आहे. सध्या सिनेमाचं पोस्टर लाँच झालं असून लवकरचं सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आचार्य अत्रे यांनी या साहित्यकृतीवर निर्मिती केलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला 'राष्ट्रपती कमळ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रपती पदक लाभलेला तो पहिला मराठी चित्रपट होता. आता सुजय डहाके दिग्दर्शित नव्या संचातील या चित्रपटातून साने गुरुजींचे कार्य जाणून घेण्याची उत्सुकता रसिकांना लागली आहे. विशेष म्हणजे ओम भूतकरने साकारलेली गुरुजींची भूमिका पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा