BREAKING NEWS
latest

दादर शिंदेवाडीत हक्काचे कार्यालय मिळण्यासाठी 'मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई' यांच्याकडून धरणे आंदोलन..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई हि महाराष्ट्रातील नामांकित संघटना. मुंबईत, महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकात 'वाचकांची पत्रे' सदर वर्तमानपत्रातील संपादकीय (अग्रलेख) पानावर वाचकांच्या पात्रांना स्थान दिले गेले आहे. असंख्य पत्र लेखक आपले विचार पत्राच्या माध्यमातून संपादकांना कळवतो, संपादक आलेल्या पत्राची खातर जमा करून पत्र आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करतात. अशा पत्र लेखन करणाऱ्या पत्र लेखकांचे पहिले संमेलन नवशक्तिचे तत्कालीन संपादक प्रभाकर पाध्ये यांनी फोर्ट येथील तांबे उपहार गृहात २२ ऑगस्ट १९४९ रोजी भरवून मराठी वृत्तपत्र लेखक संघाची मुहूर्तमेढ रोवली तिचा आज वटवृक्ष झाला सलग ७५ वर्षे संघ सामाजिक उपक्रम राबविण्यात यशस्वी झाला आहे. 

हजारो वृत्तपत्र लेखकांनी संघाच्या माध्यमातून समाजातील जटिल प्रश्न तसेच समस्या सोडवून जागल्याची भूमिका पार पाडत आहेत. १९७८ साली गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री श्रीमती शशिकला काकोडकर यांनी तत्कालीन मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. बी.जी.देशमुख यांना समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात योगदान असणाऱ्या मराठी वृत्तपत्र लेखक संघास कार्यालयीन कामकाज करण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा देण्याची विनंती केली होती. त्यानुसार संघास मुंबई महापालिकेने दादर पूर्व, शिंदे वाडी येथील मुंबई महापालिकेच्या शाळेच्या इमारतीतील तळ मजल्यावर जागा दिली होती. परंतु, २०१९ मध्ये शाळेच्या इमारतीतील भाड्याने दिलेल्या जागांच्या धोरणात बदल करून दिलेल्या जागा आपल्या ताब्यात घेतल्या. असे असताना आजही मुंबई महापालिकेतील शाळा इमारतीतील संस्थांचे कामकाज सुरळीत सुरु आहे हे त्या संस्थांच्या नामफलकांवरुन दिसून येते. मराठी वृत्तपत्र लेखक संघाने व वृत्तपत्र लेखकांनी रविवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता, दादर पूर्व, शिंदे वाडी येथील मुंबई महापालिका शाळे जवळ धरणे आंदोलन करुन शासनाचे व मुंबई महानगरपालिकेचे लक्ष वेधून घेणार आहे. यावेळी मराठी सर्व वृत्तपत्र लेखकांनी धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे यांनी केले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत