BREAKING NEWS
latest

भारताकडून आशियाई पॅरा गेम्समध्ये ५० पदकांची कमाई..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

ग्वांगझोऊ: चीनमध्ये पार पडलेल्या आशियायी खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी विक्रमी कामगिरी केली. आता येथेच सुरु असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडू यशस्वी कामगिरी करत आहेत. २२ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत या स्पर्धांचे आयोजन चीन येथील ग्वांगझोऊ येथे करण्यात आले आहे. भारत सध्या १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि २० कांस्य पदकांसह ५० पदकांसह पाचव्या स्थानावर आहे. भारतासाठी अंकुर धामा आणि रक्षिता राजू यांनी पुरुष आणि महिलांच्या १५०० मीटर टी११ स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आणि भारतासाठी पदकांचे अर्धशतक पूर्ण केले.

सुमित ऍन्टीलने बुधवारी चीनमधील ग्वांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या भालाफेक एफ६४ स्पर्धेत आपल्या सुवर्णपदकाचा यशस्वीपणे बचाव केला. तर पुरुषांच्या भालाफेक-एफ४६ फायनलमध्ये ६८.६० मीटर फेक करून सुंदर सिंगने आणखी एक विश्वविक्रम मोडला आणि सुवर्णपदक जिंकले.

पॅरॉलिम्पिक चॅम्पियन सुमित ऍन्टीलने बुधवारी एफ६४  भालाफेक स्पर्धेत एक नवीन विश्वविक्रम नोंदवला आणि सुवर्णपदक जिंकले. पंचवीस वर्षीय सुमितने ७३.२९ मीटर भालाफेकत सुवर्णपदक जिंकले. त्याने स्वतःचा ७०.८३ मीटरचा विश्वविक्रम सुधारला. त्याने यावर्षी पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकताना केला होता. याच स्पर्धेत आणखी एक भारतीय पुष्पेंद्र सिंगने ६०.०६ मीटर भालाफेकत कांस्यपदक जिंकले. सुमितने टोकियो पॅरॉलिम्पिकच्या पुरुष भालाफेक एफ६४ स्पर्धेत ६८.५५ मीटरच्या प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले होते, जो तत्कालीन विश्वविक्रम होता.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत