BREAKING NEWS
latest

दिवाळी निमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने दिपावली सणानिमित्त स्वच्छता व  विशेष साफसफाई मोहीम हाती घेतली असून सदर मोहिमेत शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांवरील धूळ माती, डेब्रिज, झाडी ई. कचरा सफाई करण्यात येणार आहे. डोंबिवली पूर्व येथील 'फ' प्रभागात सदर मोहिमेस ताई पिंगळे चौक, सर्वेश मंगल कार्यालय येथून सुरूवात करण्यात आली. सदर प्रसंगी सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप स्वच्छता अधिकारी शरद पांढरे, उदय निकुंभ, जाधव, चिकणकर आणि स्वच्छता निरीक्षक हजर होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत