BREAKING NEWS
latest

चित्रपटसृष्टीचे धगधगते पर्व - व्ही शांताराम

चित्रपटसृष्टीचे धगधगते पर्व - व्ही शांताराम
रोहन दसवडकर

शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. व्ही शांताराम यांना शांताराम बापू या नावाने देखील ओळखले जायचे. ते डॉ. कोटणीस की अमर कहानी (1946), अमर भूपाली (1951), झनक झनक पायल बाजे (1955), दो आँखे बारह हाथ (1957), नवरंग (1959), दुनिया न माने (1937) पिंजरा (1972) अशा अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी ओळखले जायचे. 
१९२० साली फाळके यांच्या पौराणिक मूकपटांच्या यशाने प्रेरित होऊन कोल्हापूरला प्रसिद्ध चित्रकार बाबूराव पेंटर यांनी स्थापलेल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त ते सामील झाले. बाबूराव पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट कलेची मूळाक्षरे तेथे त्यांनी गिरविली. नेपथ्य, छायाचित्रण, संकलन, अभिनय, खास दृश्ये (स्पेशल इफेक्ट्‌स) अशा प्रत्येक शाखेतील बारकावे व्ही. शांताराम यांनी तेथे अभ्यासले. याच कंपनीत असताना बाबूराव पेंढारकर यांनी त्यांचे ‘व्ही. शांताराम’ असे चित्रपटीय नामकरण केले.
    1927 मध्ये त्यांनी 'नेताजी पालकर' हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. १९२९ मध्ये त्यांनी विष्णुअंत दामले, के.आर.सोबत 'प्रभात फिल्म कंपनी' स्थापन केली. डायबर, एस. फतलाल आणि एस.बी. कुलकर्णी यांनी 1932 मध्ये 'अयोध्येचा राजा' हा पहिला मराठी भाषेतील चित्रपट बनवला. त्यांनी मुंबईत "राजकमल कलामंदिर" बनवण्यासाठी 1942 मध्ये प्रभात कंपनी सोडली. कालांतराने, "राजकमल" हा देशातील सर्वात अत्याधुनिक स्टुडिओ बनला.
सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता चार्ली चॅप्लिनने व्ही शांताराम यांच्या '' या मराठी चित्रपटासाठी विशेष कौतुक केले त्यांना त्यांचा माणूस हा चित्रपट फार आवडला होता. 
व्ही. शांताराम यांचे तीन विवाह झाले. त्यांची पहिली पत्नी विमल (अंबू मुगलखोड– १९२२), दुसरी जयश्री (जयश्री कामुलकर - १९४१) आणि तिसरी संध्या (विजया देशमुख–१९५६) होय. यांपैकी जयश्री व संध्या या ख्यातकीर्त अभिनेत्री म्हणून गणल्या जातात. पुढे जयश्रीशी त्यांनी घटस्फोट घेतला (१९५६). त्यांना दोन मुलगे (प्रभातकुमार व किरणचंद्र) आणि पाच मुली (सरोज, मधुरा, चारुशीला, राजश्री व तेजश्री) आहेत. प्रभातकुमार आणि किरणचंद्र यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, तर मुलींपैकी राजश्रीने अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
    सुश्राव्य संगीत हा व्ही. शांताराम यांच्या चित्रपटनिर्मितीच्या यशातील महत्त्वाचा घटक मानला जातो. वसंत देसाई, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रामलाल, राम कदम, हृदयनाथ मंगेशकर इ. नामवंत संगीत दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिले.
व्ही. शांताराम यांच्या ठायी असलेल्या औदार्याचे व माणुसकीचे विलोभनीय दर्शनही काही प्रसंगांतून घडते. भारतीय चित्रपटाचे पितामह चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचे उत्तरायुष्य अतिशय विपन्नावस्थेत गेले.
त्या काळात व्ही. शांताराम यांनी आत्मीयतेने त्यांचा उदरनिर्वाह काही काळ चालविला. व्ही. शांताराम यांच्या आत्मचरित्रातील या दोघांचा पत्रव्यवहार हृदयद्रावक तर आहेत, परंतु समस्त कला क्षेत्रातील मान्यवरांना अंतर्मुखही करणारा आहे. या श्रेष्ठ चित्रपतीचे मुंबई येथे ३० ऑक्टोबर १९९० मध्ये निधन झाले. 
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत