डोंबिवली : दिनांक २०/१०/२०२३ रोजीचे सकाळी ०७.०५ वा. चे सुमारास प्राथमिक शिक्षक रवि सोन्या गवळी (वय: ४२ वर्षे) रा. मानपाडा रोड, डोबिंवली हे मॉर्निंग वॉक करत 'डीमार्ट' समोरील रोडने जात असताना बजाज पल्सर मोटार सायकल वरील २ अनोळखी इसमांनी गवळी यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने खेचुन तसेच त्यांना जोराचा धक्का देवुन जखमी करून पळून गेले होते. प्राथमिक शिक्षक रवि गवळी यांनी दिलेल्या तकारीवरून मानपाडा पोलीस ठाणे गु.रजि.क्रमांक ८७०/२०२३ भा.द.वि. कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आल्यानंतर वपोनि. मानपाडा पोलीस ठाणे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळाला भेटी देवुन गुन्हा उघडकीस आणण्याकरीता मा.वरिष्ठांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे तपास चालु केला.
दिनांक २७/१०/२०२३ रोजी मानपाडा पोलीसांनी गोपनिय बातमीदाराकडुन तसेच तांत्रिक माहीती मिळविली असता सदर चेन स्नॅचिंगचे आरोपी नवी मुंबई-तळोजा मार्गे डोंबिवली कडे येत असल्याचे गोपनीय माहिती मिळताच मानपाडा पोलीसांनी 'निसर्ग हॉटेल' समोरील रोडवर साध्या वेशात ३ ठिकाणी सापळा रचला. तळोजा रोडकडुन आरोपीची मोटार सायकल निसर्ग हॉटेल जवळ येताच पोलीसांनी त्यांना जाळयात अडकवण्यासाठी रस्त्याने येणारी जाणारी जड वाहने रोडवर थांबवली. त्याचा आरोपींना संशय आल्याने आरोपींनी मोटार सायकल रोडवर सोडुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न मानपाडा पोलीसांनी हानुन पाडला आणि दोन्ही चेन स्नॅचरचा पाठलाग करून ताब्यात घेतले.
आरोपी नामे १) वारिस मिराज खान, (वय: २४ वर्षे) रा. अटाळी आंबिवली, कल्याण, २) मोहम्मद जाफर कुरेशी (वय: ३० वर्षे) रा. शहाड, कल्याण पूर्व यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कल्याण, कोळसेवाडी व डोबिंवली परिसरात चेन स्नॅचिंगचे एकुण ८ गुन्हे व एक मोटार सायकल चोरीचा गुन्हा केल्याची पोलीसांकडे कबुली दिली आहे. या सर्व गुंह्यांमध्ये ८,१८,५००/- रूपये किंमतीचे १५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ५०,००० /- हजार रूपये किंमतीची चोरीची बजाज पल्सर मोटार सायकल असा एकुण ८,६८,५००/- रूपये किंमतीचा मुददेमाल मानपाडा पोलीसांनी जप्त केला आहे.
१). मानपाडा पोलीस स्टेशन गु.रजि.क्र - ८७०/२०२३ भा.दं.वि. कलम ३९४, ३४,
२). डोंबिवली पोलीस स्टेशन गु.रजि.क्र - १०/२०२३ भा.दं.वि. कलम ३९४, ३४,
३). डोंबिवली पोलीस स्टेशन गु.रजि.क्र - १११ /२०२३ भा.दं.वि. कलम ३९४, ३४,
४). विष्णूनगर पोलीस स्टेशन गु.रजि.क्र - २१०/२०२३ भा.दं.वि. कलम ३९४,
५). विष्णूनगर पोलीस स्टेशन गु.रजि.क्र - ३२९/२०२३ कलम भा.दं.वि. ३९४,
६). महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन गु.रजि.क्र - ४७५/२०२३ भा.दं.वि. कलम ३९४, ३४,
७). महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन गु.रजि.क्र - ४७४/२०२३ भा.दं.वि. कलम ३९४, ३४,
८). कल्याण तालुका पोलीस स्टेशन गु.रजि.क्र - ६४७/२०२३ भा.दं.वि. कलम ३७९, ३४,
९). कोळसेवाडी पोलीस स्टेशन गु.रजि.क्र - २३२/२०२३ भा.दं.वि. कलम ३९४, ५०६, ३४ प्रमाणे अश्या ९ गुन्ह्यांची उकल करण्यात मानपाडा पोलीसांना यश प्राप्त झाले आहे.
सदरची कामगिरी मा. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, मा.सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण आणि मा. सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वपोनि. मानपाडा पोलीस ठाणे मा.अशोक होनमाने यांच्या देखरेखीखाली सुरेश मदने, पोनि (प्रशा), राम चोपडे पोनि (गुन्हे), दत्तात्रय गुंड पोनि (कावसु), सपोनि. सुनिल तारमाळे,अविनाश वनवे, सपोउपनिरी. भानुदास काटकर, पोहेकॉ. राजेंद्र खिलारे, संजु मासाळ, शिरीष पाटील, सुनिल पवार, विकास माळी, दिपक गडगे, पोना. शांताराम कसबे, यल्लप्पा पाटील, महादेव पवार, विजय आव्हाड, महेंद्र मंझा, विनोद ढाकणे, अशोक अहेर, पोना. महाजन, पोकों. चंद्रकांत खरात, संदीप खरात, पोना. पाटील, यांचे पथकाने केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा