BREAKING NEWS
latest

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेत दिली सदिच्छा भेट आणि २०२४ सालच्या येत्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदेच असणार असे दिले आश्वासन..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाचे सन्माननीय अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी २:३० वाजता शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण, कल्याण पूर्व विधानसभेचे सन्माननीय आमदार गणपत गायकवाड, भाजपा ज्येष्ठ नेते व आमदार संजय केळकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी, ज्येष्ठ नेते शशिकांत कांबळे, ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले, मंदार हळबे, संदीप पुराणिक तसेच अनेक मान्यवर नगरसेवक, पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. 
शिवसेना शहर शाखेत भेट दिलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच माननीय बावनकुळे यांच्या हस्ते शहर शाखेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित युतीच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या घोषणांनी शहर शाखा दुमदुमून सोडली.
या प्रसंगी शिवसेना शाखेतील नोटीस बोर्डवर वर्तमानपत्रातील विविध बातम्यांची कात्रणे लावली होती त्यातील बातमी वाचत २०२४ सालात कल्याण लोकसभा मतदार संघाची निवडणूक सलग दोन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आलेले डॉ. श्रीकांत शिंदे हेच लढविणार आणि ते लक्षावधी मतांनी पुन्हा निवडून येणार या वर्तमानपत्रातील लावलेल्या बातमीचा उल्लेख करून भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ सालात होणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीच्या वतीने डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हेच निवडणूक लढविणार असल्याचे आश्वासन देखील उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटीस बोर्ड वर लावलेल्या बातमीकडे बोट दाखवून दिले. यामुळे संपूर्ण शहर शाखेत आनंदी व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

या आनंदी प्रसंगी शिवसेनेचे उप-जिल्हाप्रमुख राजेश कदम, उपशहर प्रमुख राजेश मुणगेकर, कार्यालय प्रमुख प्रकाश शांताराम माने, शाखाप्रमुख वैभव राणे, संतोष चव्हाण, ज्येष्ठ शिवसैनिक सुनिल मालणकर, झोपडपट्टी महासंघ प्रमुख हरिश्चंद्र कांबळे, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे नामदेव भानुसे, पिराजी काकडे, आणि अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या उत्साहाने या आनंदात उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत