BREAKING NEWS
latest

'जाता पंढरीसी , सुख वाटे जीवा' कार्तिक यात्रेनिम्मित लाखोंमध्ये भाविकांची संख्या

'जाता पंढरीसी , सुख वाटे जीवा' कार्तिक यात्रेनिम्मित लाखोंमध्ये भाविकांची संख्या

रोहन दसवडकर

  ' जाता पंढरीसी , सुख वाटे जीवा ' अशा भावनेने कार्तिकी यात्रेच्या आनंद सोहळ्यातील सुख अनुभवण्यासाठी आणि विठुरायाच्या दर्शनाने तृप्त होण्याकरिता सुमारे चार लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत . भाविकांमुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज ११ तास लागत होते . शहरातील सर्व लॉज , मठ आणि धर्मशाळा वारकऱ्यांच्या गर्दीमुळे हाऊसफुल झाल्या असल्या तरी यंदा यात्रेकरूंच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे जाणवत आहे . 


  कार्तिकी यात्रेसाठी विविध भागांतून निघालेल्या पायी दिंड्या पंढरपुरात पोचल्या असून जिकडे पाहावे तिकडे हाती भगवी पताका , कपाळी गंध आणि मुखी ' ज्ञानोबा - तुकोबां'चा जयघोष करत निघालेले वारकरी दिसत आहेत . प्रत्येकाला सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे . वारकऱ्यांच्या गर्दीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरासह प्रदक्षिणा मार्ग , चंद्रभागेचे वाळवंट आणि नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर परिसर भक्तिमय झाला आहे , परंतु कार्तिकी यात्रेत दरवर्षीइतकी गर्दी यंदा दिसत नाही . राज्याच्या काही भागांतील दुष्काळी स्थिती आणि आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम यात्रेवर झाला आहे . 
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत