BREAKING NEWS
latest

दिवाळी निमित्त कै.लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था तर्फे आयोजित भजनाचा तिरंगी सामना संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: शिवसेना शाखा कोपरगांव, वॉर्ड क्र.६५, आणि कै.लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था रजि. आयोजित दिवाळी निमित्त भजनाचा तिरंगी सामना शनिवार दि.१८ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वा. शिवसेना शाखा क्र.६५ च्या बाजूला, गावदेवी रोड, मच्छी मार्केट च्या मागे, कोपरगाव, डोंबिवली (पश्चिम) येथे भरावण्यात आला होता. या तिरंगी सामन्यात बुवा श्री. शैलेश परब श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ कोपर भजनसम्राट गुरुवर्य बुवा श्री.श्यामसुंदर आचरेकर यांचे शिष्य, पखवाज वादक - कु. साई गावडे, तबला वादक - कु. सहदेव सावंत, बुवा श्री. संजय घाडी श्री गांगो बसिक प्रासादिक भजन मंडळ सांताक्रुझ वाकोला, गुरुवर्य बुवा सुप्रसिध्द श्री.सुदेश कुरतडकर यांचे शिष्य, पखवाज वादक  कु. सचिन धुरी, तबला वादक - कु. सुजल घाडी तसेच बुवा श्री. विजय गावडे श्री गिरोबा प्रासादिक भजन मंडळ मु.पोस्ट गावराई, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग गुरुवर्य बुवा सुप्रसिध्द भजनकार, कोकणरत्न श्री. सतीश रोहिदास सावंत यांचे शिष्य, पखवाज वादक कु. प्रथमेश परब, तबला वादक - श्री. राजन गावडे यांच्यात भरपूर लोकांच्या उपस्थितीत रंगला.
या भजनाचा तिरंगी सामन्याचे निमंत्राक बुवा श्री.अमोल राणे, बुवा श्री.शैलेश परब, बुवा श्री. संजय विलास पवार यांच्या उपस्थितीत मा. नगरसेवक तथा मा. सभापती परिवाहन समिती चे संजय लक्ष्मण पावशे तसेच शाखा संघटक अपर्णा संजय पावशे यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आला. या सामन्याला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. भजनाचा या तिरंगी सामन्याचे नियोजन गुरुनाथ खोचरे, संदेश चव्हान, जगन्नाथ जाधव, सुभाष गायकवाड, धनाजी बुद्रुक, श्याम नाईक, भावेश चव्हाण सारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सहभागाने पार पडला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत