डोंबिवली - दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे गरीब कुटुंबांना दिवाळी गोड करता यावी यासाठी सामाजिक बांधिलकी जपत यंदाही कोपर शिवसेना शाखा क्र.६५ च्या वतीने गरिबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने कोपर शिवसेना शाखेत सोमवारी सायंकाळी हजारो महिलांना या दिवाळीच्या जिन्नसाचे वाटप करण्यात आले. शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय पावशे आणि त्यांच्या पत्नी समाजसेविका अपर्णा संजय पावशे तसेच चिरंजीव पार्थ संजय पावशे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. दिवाळी आणि पार्थ पावशे याचा वाढदिवसाचा योगायोग साधून गरजू, गरीब आणि वंचितांना हे वाटप करण्यात आले.
यावेळी संजय पावशे असे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदर डाॅ.श्रीकांत एकनाथ शिंदे, डोंबिवली शिवसेना शहर शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली कोपर शिवसेना शाखेत २००८ साली मी नगरसेवक झाल्यावर विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शिवसेना ही कायम सामाजिक बांधिलकी जपत आली असून कोपर शाखा सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असते. कायम लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, वैयक्तिक गरजा भागवण्याचे काम या शाखेच्या माध्यमातून केले जाते. डोंबिवलीतील पहिली शिवसेना शाखा अशी आहे की जिथे महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित असतात. फराळ घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली असताना व्यवस्थित नियोजन करून दरवर्षी प्रमाणे फराळाचे वाटप गरजू - गरीब महिलांना करण्यात आले.
फराळ वाटपासाठी सुभाष गायकवाड, प्रभाकर पवार, संदेश चव्हाण, प्रकाश आंबेरकर, गुरुनाथ कोचरे, जगन्नाथ जाधव, गौतम जाधव, दत्तू गरग कांताबाई म्हात्रे, अनिता भोईर, सीमा गायकवाड, वर्षा गंधारे या शिवसैनिकांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा