BREAKING NEWS
latest

अट्टल घरफोडी व चोरी करणाऱ्या आरोपीच्या मानपाडा पोलीसांनी आझमगड, उत्तरप्रदेश येथुन गठडी वळवून मुसक्या आवळत केला २१,२६,६०० रुपये किंमतीचा ३४३.५ ग्राम सोन्याचा ऐवज हस्तगत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: फिर्यादी ओमकार विलास भाटकर रा. भोपर रोड, देसलेपाडा, डोंबिवली (पूर्व) हे रक्षाबंधन सणाकरीता गावी गेले असता दिनांक ३०/०८/२०२३ रोजी दुपारी ०१.३० ते ०४:०० वाजण्याच्या दरम्यान यातील आरोपी याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयडा तोडून कपाटातील लॉकरमधील सोन्या चांदीचे दागिने चोरी करून नेले होते. ओमकार भाटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्र. ६५०/२०२३ भादवि कलम ४५४,३८० प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदरचा गुन्हा उपडकीस आणण्याच्या दृष्टीने मानपाडा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना दिलेल्या सुचनांप्रमाणे तपास चालू केला. सदर गुन्ह्यातील आरोपी हा अज्ञात असल्याने त्याच्याबाबत काहीही पुरावा अथवा माहिती नसताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने अथक परिश्रम करून त्यांचे गुप्त बातमीदार व तांत्रिक पवने कसुन तपास करून पोलीस अभिलेखावर असलेला अट्टल घरफोडया व चोऱ्या करणारा आरोपी राजेश अरविंद राजभर राहणार जावसाई गाव, लक्ष्मीनगर, अंबरनाथ (प) मुळगाव ग्राम कंजहित रायपुर, पो.स्टे. देवगाव, तहसील: लालगंज, जिल्हा: आजमगढ़ राज्य: उत्तरप्रदेश याने सदरचा गुन्हा केल्याची खात्री करून त्यास निष्पन्न केले. त्यानंतर सदर आरोपीच्या ठावठिकाणाबाबत गोपनीय माहिती मिळवली असता तो मुळगाव जिल्हा: आजमगढ़ राज्य: उत्तरप्रदेश येथे जावून आपले अस्तित्व लपवून राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. सदर आरोपीच्या शोधासाठी एक विशेष पोलीस पथक तयार करून आजमगड, उत्तरप्रदेश येथे पाठविले. सदर पथकाने आरोपीच्या येणाजण्याच्या मार्गाची माहिती काढुन त्यामार्गावर असलेल्या वीटभट्टी कारखाण्यावर थांबून  कामगारांप्रमाणे पेहराव करून सापळा लावला. त्याचवेळी आरोपी हा त्याच्या पल्सर मोटार सायकलवर येताना दिसताच सदर पोलीस पथकाने आरोपीस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यास उत्तरप्रदेश येथून दिनांक. ३०/१०/२०२३ रोजी ताब्यात घेण्यात आले. 
त्यानंतर त्याच्याकडे कसून केलेल्या तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली म्हणुन त्यास सदर गुन्ह्यात अटक केली असता त्याने कल्याण, डोंबिवली व नवी मुंबई परिसरातील खालील ०७ गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीकडुन २१,२६,६००/- रूपये किंमतीचे ३४३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे असा मुददेमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपीस दिनांक. ०७/११/२०२३ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर असुन पुढील तपास चालू आहे.
वरील प्रमाणे गुन्हे उपडकीस आलेले असुन आरोपी याने यापूर्वी देखील घरफोडी चोरीचे गुन्हे केले असून त्यामध्ये वरील आरोपी यास अटक झालेली आहे. आरोपी राजेश अरविंद राजभर याचा पुर्व गुन्हे अभिलेख खालील प्रमाणे -
सदरची कामगिरी दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण, सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३. कल्याण व सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक होनमाने वपोनि, मानपाडा पोलीस ठाणे यांच्या देखरेखीखाली सुरेश मदने पोनि (प्रशासन), राम चोपडे पोनि (गुन्हे), दत्तात्रय गुंड पोनि (का व सु), सपोनि. सुनिल तारमळे, अविनाश वणवे, प्रशांत आंधळे, सपोउपनिरी भानुदास काटकर, पोहवा. सुनिल पवार, संजु मासाळ, विकास माळी, शिरीष पाटील, राजेंद्र खिलारे, दिपक गडगे, सोमनाथ ठिकेकर, पोना. यलप्पा पाटील, देवा पवार, गणेश भोईर, शांताराम कसबे, प्रविण किनरे, अनिल घुगे, पोशि. अशोक आहेर, विजय आव्हाड, महेंद्र मंजा, नाना चव्हाण यांचे पथकाने यशस्वीपणे केलेली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत