BREAKING NEWS
latest

दिवाळीच्या आधीच कांद्याने केली सत्तरी पार..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
मुंबई: भर हिवाळ्यात दिवाळीच्या तोंडावर दर वर्षीच भाव खाणाऱ्या कांद्याने आता यावर्षीही सत्तरी पार केली आहे. थंडीच्या सुरुवातीस नवीन आवक सुरु होत असताना दरवर्षीच कांद्याचे भाव चढे असतात तसे  यावर्षी खराब हवामानामुळे खरीप काद्यांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. पेरणी उशीरा झाल्याने कांदा पिकाला फटका बसून खरीप पीक लवकर हाती येणार नसल्याने बाजारात तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असे चित्र आहे. काद्यांचा साठा कमी होत आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारात दिसून येत आहे.

दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यात तर दक्षिणेतील काही राज्यात काद्यांने ७० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर देशातील ६ राज्यांमध्ये कांद्याची किंमत ६० रुपयांच्या पुढे पोहचली आहे. त्यामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. कांद्यामुळे यापूर्वी पण देशात रोष वाढला होता. कांद्याने यापूर्वी अनेक राज्य सरकारांना हादरे पण दिले होते. केंद्र सरकारने किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी आता तातडीने उपाय योजना केली आहे. कमी उत्पादन आणि वेळेवर पुरवठा न झाल्याने कांद्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे.

कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉक बाजारात आणला आहे. पण त्याचा थेट परिणाम दिसला नाही. अनेक राज्यांमध्ये कांद्याच्या किंमती ७० रुपये अथवा त्यापेक्षा अधिक आहेत. किरकोळ बाजारात हा भाव ८० रुपये किलोवर पोहचल्याचे चित्र आहे. तर काही राज्यात हा भाव ६० रुपयांच्या घरात पोहचला आहे.

५ राज्यांच्या निवडणूका तोंडावर आलेल्या असताना कांद्याचे वाढते भाव सरकारला परवडणारे नाहीत. त्यामुळे आता दर नियंत्रणासाठी सरकारला हस्तक्षेप करावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत