डोंबिवली : संजय पावशे व अपर्णा संजय पावशे यांच्या तर्फे कोपरगाव येथे आधार कार्ड व आभा कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी कोपरगाव शिवसेना शाखा क्र.६५ येथे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजे पर्यंत हे शिबीर सुरू असणार आहे. या आधार कार्ड योजने अंतर्गत ० ते १८ वयोगटापर्यंत नवीन नाव नोंदणी तसेच आधार कार्ड वरील नाव, पत्ता दुरुस्ती, फोटो अपडेट त्याचप्रमाणे मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केला जाईल. त्याच प्रमाणे 'आयुश्यमान भारत' डिजिटल हेल्थ कार्ड ही या शिबिरात काढता येणार आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संजय पावशे यांच्या तर्फे कोपरगाव प्रभागातील नागरिकांना दिवाळी निमित्त मोफत फराळ साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी संजय पावशे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा