रोहन दसवडकर
ललितच्या घरातून ५ किलो सोने जप्त ललितने ससूनमधून पलायन केल्यानंतर त्याच्या शोधार्थ पुणे पोलिसांचे पथक ललितच्या नाशिक येथील घरी गेले होते. यावेळी घराच्या झडतीमध्ये पोलिसांनी तब्बल तीन किलो सोने जप्त केले होते . सध्या ललित पाटील पुणे पोलिसांच्या कोठडीत असून त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे . करून ड्रग्स रॅकेट चालविण्याचे आढळून आले . गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्यामार्फत अपर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण काययाखाली ( मोक्का ) कारवाई मोक्का कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता . प्रस्तावाला पोकळे यांनी मान्यता दिली . अमली पदार्थ विकून मिळालेल्या पैशातून ललितने हे सोने विकत घेतले होते . त्यातील यापूर्वी तीन किलो सोने जप्त केले असताना आता आणखी ५ किलो सोने जप्त करण्यात आल्याने ललितने अजून किती माया साठवून ठेवली आहे .
आणखी १२ गुन्हेगार कोण?
ललित अनिल पाटील ( वय ३७ , रा . नाशिक ) , अरविंदकुमार प्रकाशचंद लोहरे ( ३ ९ , उत्तर प्रदेश ) , अमित जानकी सहा ऊर्फ सुभाष जानकी मंडल ( २ ९ , रा . देहूरोड ) , रौफ रहिम शेख ( १ ९ , रा . ताडीवाला रोड ) , भूषण अनिल पाटील ( ३४ , नाशिक ) , अभिषेक विलास बलकवडे ( ३१ , रा . नाशिक ) , रेहान ऊर्फ गोलू आलम सुलतान अहमद अन्सारी ( २६. धारावी , मुंबई ) , प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित माहिरे ( ३ ९ , नाशिक ) , जिशान इकबाल शेख ( 33 . रा . नाशिक ) , शिवाजी अंबादास शिंदे ( ४० , रा . कसारा , नाशिक ) , राहुल पंडित ऊर्फ रोहितकुमार चौधरी ऊर्फ अमितकुमार ( ३० , रा . विरार ) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा