रोहन दसवडकर
उपनगरी रेल्वेमार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मुख्य मार्गावर शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेणार आहे . तर रविवारी ५ नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
कुर्ला ते वाशी अप - डाउन हार्बर मार्गावर , रविवार सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत. परिणामी सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर आणि बेलापूर ते सीएसएमटी लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत . ब्लॉक काळात प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल धावतील . तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान लोकल सुरू राहणार आहे .
मध्य रेल्वे भायखळा ते माटुंगा अप - डाउन जलद मार्गावर, शनिवारी मध्य रात्री १२.३५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत. परिणामी या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथे येणाऱ्या अप मेल / एक्स्प्रेस माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील . तसेच दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर एक्स्प्रेसला दोनदा थांबा दिला जाईल . डाउन मेल / एक्स्प्रेस भायखळा ते माटुंगा दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या एक्स्प्रेसला दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दोनदा थांबा देण्यात येणार आहे .
.
.
.
.
#मुंबई #localtrain #मेगाब्लॉक #latestnews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा