BREAKING NEWS
latest

'फाउंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन - मुस्कान' संस्थेमार्फत 'वॉक फॉर चाईल्ड प्रोटेक्शन' संपन्न..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

पूणे : १४ नोव्हेंबर हा आपण बाल दिन म्हणून साजरा करतो यानिमित्त एफएफसिपी - मुस्कान संस्थेच्या वतीने बाल लैंगिक अत्याचार या विषयाची जनजागृती करण्यात आली. सध्याच्या काळात बाल लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत चालल्या आहेत. या बाल लैंगिक अत्याचारांच्या घटना घडू नये तसेच अश्या घटना घडत असल्यास अश्या घटना रोखण्यासाठी आपण एक पाऊल पुढे उचलले पाहिजे या साठी हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज उद्यान पासून कलाकार कट्टा तेथून उद्यान पर्यंत घेण्यात आला यामध्ये ५० पेक्षा अधिक लोक बाल लैंगिक विरोधात चालले. यातून समाजामध्ये बाल लैंगिक अत्याचाराबाबत तसेच पॉक्सो कायद्याबाबत पोस्टर्स च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मा. अशोक घोरपडे (मुख्य उद्यान अधीक्षक), पुणे महानगर पालिका यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कीर्ती दिनी यांनी केले. तर परिश्रम प्रमोद पाटील, पूजा कडू व संपूर्ण टीम यांनी घेतले. यासाठी संस्थेच्या संचालिका शुभदा रणदिवे, शर्मिला राजे व शर्मिला खेर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
'मुस्कान' संस्थेच्या वतीने सारस बाग, भक्ती-शक्ती उद्यान पिंपरी चिंचवड या ठीकणी सुद्धा पथनाट्य व रॅप साँग च्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात येणार आहे. अश्या घटना आपल्या जवळपास घडत असेल तर पोलिसांना किंवा एफएफसिपी - मुस्कान संस्थेच्या ९६८९०६२२०२ /  ९११२२९९७८४ / ८५ या क्रमांकावरती फोन करून माहिती देण्याचे आव्हान करत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत