BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील 'जाह्णवी मल्टी फाउंडेशन' विद्यालय येथे गुरुनानक जयंती उत्साहात साजरी..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि. २७ : काल गुरुनानक जयंती निमित्त डोंबिवली पश्चिमेकडील 'जाह्णवी मल्टी फाउंडेशन' च्या जन गण मन इंग्लिश सेकंडरी, जन गण मन विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय तसेच वंदे मातरम वरिष्ठ महाविद्यालयातील 'मधुबन बँक्वेट हॉल' मध्ये गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून गुरुनानक जयंती तसेच तुलसी विवाह असा दुग्ध शर्करा योग साधून साजरा करण्यात आला.
शीख धर्माचे संस्थापक तसेच कोणत्याही जाती धर्मांचे विभाजन न करता सर्वांनी एकत्रित पणे भूमीवर आसनस्थ होऊन भोजन करणे ह्या गोष्टीचा पायंडा संत गुरुनानक यांनी पाडला. मोठ्या प्रमाणत संपूर्ण देशातच लंगर चे आयोजन केले जाते त्याच प्रमाणे जेएमएफ संस्थेत देखील आयोजन केले गेले.
हिंदू धर्मामध्ये वृंदेला म्हणजेच तुळशीला पवित्र मानले गेले आहे. कार्तिकी द्वादशी पासून ते पौर्णिमा पर्यंत तुळशी विवाह मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू म्हणजेच भगवान श्रीकृष्णा यांच्याशी तुळशीचा विवाह केला जातो. संस्थेतील सर्व मुलांना पवित्र हिंदू धर्माचे आकलन व्हावे ह्या हेतूने शाळेत काल तुलसी विवाह देखील करण्यात आला.
या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. सौ.प्रेरणा राजकुमार कोल्हे यांनी गुरुनानक देवा बद्दलचा मुलांना महिमा सांगितला. तसेच तुलसी विवाह कथा काय आहे ह्याचे विवेचन करून मुलांना छोटीशी गोष्ट देखील सांगितली. परमेश्वराचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, त्यांनी आपले जीवन किती सुखकर केले आहे. आपण त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. डॉ. कोल्हे सरांनी उपस्थित सर्वांकडून ध्यानधारणा करून मोठ्या प्रमाणात लंगरचे आयोजन करण्यात आले होते. या लंगरचा आस्वाद सर्व कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थ्यांनी घेतला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत