डोंबिवली दि.२६ : डोंबिवली पश्चिम येथील भाजप मंडल सचिव डॉ. सर्वेश शाहू सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांचा हस्ते भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. 'डोंबिवलीतील नागरिकांचा भाजप व रवींद्र चव्हाण यांच्यावर विश्वास असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे' असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली येथील पश्चिम मंडलाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगीच्या कार्यक्रमात म्हटले.
डोंबिवली पश्चिम मंडल सचिव डॉ. सर्वेश सावंत यांच्या डोंबिवली पश्चिमेकडील कैलास नगर येथील 'न्यू फ्लोरा सोसायटी' मधील भाजप जनसंपर्क कार्यालयाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी प्रज्ञेश प्रभूघाटे, डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष समीर चिटणीस, दिनेश जाधव, माजी नगरसेवक मुकुंद (विशू) पेडणेकर, डॉ. सर्वेश सावंत, त्यांची आई सीमा सावंत, प्रशांत पाटेकर, कैलास पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डोंबिवलीकरांनी भाजपवर विश्वास ठेवल्याबद्दल आभारी आहे. आपल्या पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान म्हणून पहायचे आहे. नागरिकांच्या समस्या ऐकूण घेण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. त्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येथील नागरिकांचा रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या विकास कामावर विश्वास आहे. २०२४ ला मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी देशभरात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रभागात कार्यालय सुरू होत आहे. प्रत्यक्षात या कार्यालयात सर्व विषयांवर चर्चा करणे आणि मतदारांना देण्यात येणारा विश्वास हे मध्यम असणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजप करीत असलेला विकास यावर विश्वास संपादन करून निकिता शिगदाडे, सागवी विकाले, नीलम मोहिते, वृषाली, आरती कांबळे या महिलांनी तर विनायक माणिक जगताप, यश म्हात्रे, नितीन सुपेकर, राहुल सुपेकर, संदेश जगताप, अतुल कांबळे, शुभम शर्मा, नरेश नामदेव भोईर, प्रशांत जोशी, विघ्नेश घोसाळकर, संतोष प्रजापती, अमित म्हात्रे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा