BREAKING NEWS
latest

तामिळनाडू चे अंधांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वर्चस्व..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
लातूर : लातूर मध्ये झालेल्या अंधांच्या राष्ट्रीय कनिष्ठ गटाच्या बुद्धिबळ स्पर्धेत गतवर्षीप्रमाणे याही वर्षी तामिळनाडू येथील सेम पॅॅनियल आणि महाराष्ट्राच्या तनिष वाघमारे यांनी स्पर्धेचे विजेतेपद व उपविजेतेपद आपल्याकडे राखले. तृतीय पारितोषिक तमिळनाडू येथील जॉन हॅरीस यांनी पटकावले.

गुजरातचा राहुल वाघेला चौथ्या स्थानावर आणि दिल्लीचा अश्विन राजेश पाचव्या स्थानावर असे यश खेळाडूंनी संपादन केले. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम प्रशस्तीपत्र तसेच सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत