BREAKING NEWS
latest

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे खास दिवाळी निमित्त ८ ठिकाणी ५० टन स्वस्त दरात साखर वाटप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट व लाडके खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या  मार्गदर्शनानुसार डोंबिवली शहरात विविध आठ ठिकाणी सन्माननीय नागरिकांसाठी दिवाळीनिमित्त स्वस्त दरात साखर २ किलो प्रति कुटुंब २०/- रुपये प्रति किलो दराने वाटप करण्यात आले. सदर स्वस्त दरात साखर वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ सन्माननीय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अनुमतीने, डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उप-जिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्या मुख्य: उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी डोंबिवली शहर व परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी या स्वस्त दरात साखर वाटप उपक्रमाला शेकडोंच्या संख्येने उपस्थीत राहून प्रचंड प्रतिसाद दिला.

सदर साखर वाटप शुभारंभ कार्यक्रमाच्या वेळी डोंबिवली शहर सचिव तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण, कार्यालय प्रमुख आणि माजी नगरसेवक प्रकाश शांताराम माने, डोंबिवली उपशहर प्रमुख गजानन व्यापारी, दिनेश शिवलकर, उपकार्यालय प्रमुख बालन मोरे, शैलेंद्र भोजने, उपशहर संघटक प्रकाश सागरे, ज्ञानेश पवार, विभागप्रमुख राकेश जगे, युवा सेना डोंबिवली शहर अधिकारी सागर जेधे, युवा सेना विधानसभा क्षेत्र अधिकारी सागर दुबे, ज्येष्ठ शिवसैनिक सागर बापट, उपविभाग प्रमुख प्रवीण पवार, सागर इंगळे, महिला आघाडी डोंबिवली पूर्व शहर संघटक स्वातीताई हिरवे, प्रमिलाताई जाधव, शाखाप्रमुख भूषण भगत, वैभव राणे, श्रीकांत कोडते इत्यादी मान्यवर पदाधिकारी व शिवसैनिक नागरिकांना सहकार्य करण्यासाठी जातीने उपस्थित होते.

सदर ५० टन स्वस्त दरात साखर वाटप करण्यात येणारी डोंबिवली शहरातील ८ ठिकाणे खालील प्रमाणे आहेत.
डोंबिवली पूर्व विभाग
१) शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेसमोर.
२) शिवसेना, विभाग प्रमुख अमोल पाटील यांचे गोग्रासवाडी येथील शाखेसमोर.
३) विभाग प्रमुख अनिल म्हात्रे यांच्या नांदिवली रोडवरील कार्यालयासमोर.
४) उपतालुकाप्रमुख उमेश पाटील यांच्या समर्थ नगर, नांदिवली रोड येथील कार्यालयासमोर.
डोंबिवली पश्चिम विभाग
५) केतकीताई पोवार, रेती भवन समोर, डोंबिवली पश्चिम.
६) नगरसेवक रणजीत जोशी यांचे देवी चौक येथील डोंबिवली पश्चिम कार्यालय.
७) परेश म्हात्रे यांची दीनदयाळ पथावरील शिवसेना शाखा, डोंबिवली पश्चिम.
८) शिवसेना उपशहर प्रमुख दिनेश शिवलकर जुनी डोंबिवली रिक्षा स्टँड नंबर एक डोंबिवली पश्चिम या ८ ठिकाणी ११ नोव्हेंबर रोजी साखर वाटप करण्यात येईल असे शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत