BREAKING NEWS
latest

दिवाळीत फटाके फोडण्यासाठी कोर्टाने दिले फक्त तीन तास..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिवाळीत फक्त ३ तासांसाठी म्हणजेच संध्याकाळी ७ ते रात्री १० पर्यंत फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्यानंतर उच्च न्यायालयाने थेट निर्देश दिले आहेत.

मुंबईतील वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे. न्यायालयातील वकिलांनी प्रदूषणाबाबत अनेक मुद्द्यांवर युक्तिवाद केला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांनी मुंबईत सुरू असलेली मोठी बांधकामे काही दिवस थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासगी आणि सरकारी मोठे प्रकल्प, हवा प्रदूषित करणारे प्रकल्प काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाने आपल्या आदेशात सुधारणा करत सरकारला शुक्रवारपर्यंतची मुदत दिली आहे. प्रकल्पापेक्षा मुंबईकरांचे जीवन महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने म्हटलं. त्यामुळे प्रकल्प काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश देत आहोत असे न्यायालयाने म्हटलं आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत