डोंबिवलीकर प्रतिष्ठानतर्फे सेंटर ऑफ एक्सेलन्सच्या माध्यमातून डिजिटल अकॅडेमीची स्थापना ८ नोव्हेंबरला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजितदादांच्या उपस्थितीत आभासी पद्धतीने करण्यात आले.
डोंबिवली परिसरातील तरुणाईला तंत्रज्ञान क्षेत्रात "जॉब रेडी" करणारे डिजिटल प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टिम्स, मशीन लर्निंग, डेटा ऍनालिसिस यांसारख्या हजारो नोकऱ्या उपलब्ध असलेल्या क्षेत्रात सतत कर्मचारी हवे असतात. त्याच अनुषंगाने नामदार रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवलीकर प्रतिष्ठाननी नामांकित कंपनी कॅपजेमिनीच्या सहकार्याने डोंबिवलीत सेंटर ऑफ ऍक्सलन्स समजली जाणारी डिजिटल एकॅडेमी स्थापन केली असून ८ नोव्हेंबर रोजी त्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी आभासी माध्यमातून केले.
डिजिटल एकॅडेमी मध्ये प्रशिक्षणार्थींना सर्व अद्ययावत उपकरणांनी युक्त अशी अत्याधुनिक लॅब उपलब्ध केली असून कुठल्याही शाखेचे पदवी किंवा इंजिनिअरिंगचे शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. प्रत्येक वर्गात ३५-४० विद्यार्थी यानुसार एकूण ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. अत्यंत महत्वाचे म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 'आयटी' आणि 'आयटीईएस' क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डोंबिवलीकर तरुणाईला कौशल्य विकासासोबतच रोजगाराची सुयोग्य संधी मिळायला हवी यासाठी आपल्या डोंबिवलीकर प्रतिष्ठानच्या वतीने हा नवीन उपक्रम राबवण्यात येत असल्याचे नामदार रविंद्र चव्हाण यांनी प्रसिध्दी माध्यमांना सांगितले. या एक्सलन्स सेंटरमध्ये 'कॅम्पस टू टेक्निकल करिअर्स (सीटूटीसी)' हा उपक्रम राबवला जात आहे. हा कोर्स कौटुंबिक उत्पन्न ५ लाखाच्या खाली असलेल्यांकरिता असून कोर्स पूर्ण मोफत असणार आहे.
सदर 'सेंटर ऑफ एक्सलन्स' वृंदावन कॉम्प्लेक्स, गणेश नगर, डोंबिवली पश्चिम येथे डोंबिवलीकर प्रतिष्ठान उभारण्यात आले आहे. १८ ते २५ या वयोगटातील वंचित तरुण-तरुणींना 'आयटी' आणि 'आयटीईएस' क्षेत्रात करियर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा मानस असून मुली/महिलांच्या कौशल्य विकासावर विशेष भर देण्याचे ठरवले आहे अशी माहिती नामदार चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा