BREAKING NEWS
latest

काटई गावात वऱ्हाडयांच्या आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत तुलसी विवाह थाटामाटात साजरा..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२४: डोंबिवलीतील कल्याण-शीळ रस्त्यालगत काटई गावात गेल्या १८ वर्षांपासून शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अर्जुन पाटील तुळशीचे लग्न समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. काटई गावात शुक्रवारी सायंकाळी आयोजित तुळशीच्या लग्न समारंभास वऱ्हाड्यांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली.
जुनी पारंपारिक पद्धत सुरू रहावी म्हणून गेले अठरा वर्ष हा तुळशी चा लग्न समारंभ आम्ही ह्या गावात मोठ्या उत्साहाने साजरा करत असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. या तुळशीच्या लग्न समारंभास मी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून सलग ३ वर्षे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आवर्जून उपस्थित राहतात. खासदार शिंदे यांनी या गावात समाजमंदिर सभागृह बांधण्यास ५० लाखांचा निधी दिला ज्याचे बांधकाम एक वर्षात पूर्ण तयार होऊन आज त्याचे उद्घाटन खासदारांच्या हस्ते झाले. काटई स्मशानभूमी करिता खासदारांनी ३० लाखांचा निधी दिला त्यातून स्मशानभूमी देखील तयार झाली असून नुकतेच काटई गावासाठी साकव उभारण्यासाठी २५ लाख रुपयांचे टेंडर मंजूर झाले असून खासदारांनी काटई  गावासाठी खूप काही केले असून त्यांचे काटईच्या लोकांवरील लेल्या प्रेमाखातरं खासदारांचे मनापासून आभार मानले.
याही वर्षी हजारो वऱ्हाडयांच्या आणि कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तुळशी चे लग्न समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. या तुलसी विवाहाप्रसंगी हजारो महिला उपस्थित होत्या. या तुळशीच्या लग्न समारंभास उपस्थित सर्व महिला भगिनींसाठी खास आकर्षण म्हणून स्पर्धात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या महिलांसाठी आकर्षक पारितोषिकं वितरित करण्यात आली ज्यात प्रथम पारितोषिक सोन्याची नथ, दुसरे पारितोषिक चांदीचे पैंजण तसेच तिसरे पारितोषिक म्हणून पैठणी साडी वाटण्यात आली. तसेच उपस्थित सर्व महिलांना साडी व नववारी देऊन सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यात खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक नवीन गवळी, विकास म्हात्रे, रवी मट्या पाटील, नितीन मट्या पाटील, साई शेलार, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, एकनाथमामा पाटील, राम पाटील, गजानन पाटील, वारकरी संप्रदाय चे हभप जयेश भाग्यवंत, कीर्तनकार अनंत महाराज आदींनीही सहभाग घेतला. अक्षदा, वऱ्हाडी मंडळी, अंतरपाट, जेवणाचा थाट त्यानंतर आईस्क्रीम अशा मोठ्या उत्साहात व थाटामाटात हा तुलसी विवाह सोहळा पार पडला. यावेळी खासदार शिंदे यांनी उपस्थितांना तुलसी विवाहाच्या शुभेच्छा दिल्या.



« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत