BREAKING NEWS
latest

शिवसेना कल्याण ग्रामीण संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न..

lप्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२४ : डोंबिवलीतील खोणी पलावा सिटी येथील एम्स हॉस्पिटल च्या येथे शिवसेना कल्याण ग्रामीण संपर्क कार्यालयाच्या भव्य उद्घाटनाचा सोहळा लोकसभेचे लाडके कार्यसम्राट खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना कल्याण ग्रामीण संपर्क कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. खासदार यांचे संपर्क कार्यालय शिवसेनेची मध्यवर्ती शाखा डोंबिवली येथे असून डोंबिवलीतील वाढत्या लोकसंख्यामुळे खोणी, हेदुटने, उसरघर, कटाई च्या रहिवाश्यांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी लांब प्रवास करून यायला लागू नये व या कल्याण ग्रामीण च्या जनसंपर्क कार्यालयात तक्रारदारांना सहजरित्या येता यावे व आपल्या तक्रारी व गाऱ्हाणी मांडता यावी हा दृष्टीकोन ठेवून या कार्यालयाचे निर्माण करण्यात आल्याची माहिती लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी प्रसिध्दी माध्यमांसमोर दिली.
  या नयनरम्य उद्घाटन सोहळ्याला सायंकाळी सात वाजल्या पासून पलावा सिटीतील स्थानिक रहिवासी तसेच डोंबिवली शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते. त्यात जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहर शाखाप्रमुख राजेश मोरे, ग्रामीण उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, माजी नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे, संजय पावशे, जनार्धन म्हात्रे, विकास म्हात्रे, राहुल म्हात्रे, रवी मट्या पाटील, नितीन मट्या पाटील, प्रकाश शांताराम माने, संतोष चव्हाण, अभिजित दरेकर, जितेन पाटील, गजानन व्यापारी, कल्याण जिल्हा संघटक लता पाटील आदी महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पोरजी यांनी केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत