BREAKING NEWS
latest

चोरीच्या ५ मोटारसायकली हस्तगत करत गुन्हे शाखा घटक-३ कल्याण पोलीसांनी मोटार सायकल चोराला केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिबली: आज रोजी गुन्हे शाखा घटक-३ पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करत असताना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत पोहवा. विश्वास माने यांना माहिती मिळाली की, एक अनोळखी इसम काटई नाका, काटई गांव, डोंबिवली पूर्व येथे काळ्या रंगाची हिरो होन्डा कंपनीची 'सीडी डॉन' ही चोरीची मोटार सायकल घेवून उभा आहे. अशी माहिती मिळताच पोलीसांनी सदर इसमास काटई नाका, डोंबिवली या ठिकाणाहुन होन्डा कंपनीची 'सीडी डॉन' दुचाकी क्रमांक एमएच ०५ एडब्ल्यु ७६३१ सह ताब्यात घेवुन त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याचे नाव निरज रामकेश चौरसिया (वय: १९ वर्षे) रा. तानाजी पाटील चाळ रूम नं. ०४, महालक्ष्मी नगर, सावंत पार्क, अंबरनाथ पूर्व असे असल्याचे समजले. 

सदर मोटार सायकलीबाबत त्याची विचारपुस करता त्याने ती मोटार सायकल महात्मा फुले चौक पोलीस ठाणे परिसरातुन चोरी केलेली असल्याबाबत कबूल केले. त्याप्रमाणे खात्री करता, महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ६९३/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. त्यानंतर त्याला पोलीसी खाक्या दाखवून अधिक चौकशी केली असता, त्याच्या ताब्यातुन नमुद दुचाकी मोटार सायकल व्यतिरिक्त इतर आणखी ०४ दुचाकी मोटार सायकल असा एकुण १,२५,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमुद मोटार सायकली बाबत खात्री करता, महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन, विष्णुनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या आरोपीस गुन्ह्याच्या पुढील तपासकामी मिळून आलेल्या मुद्देमालासह महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, कल्याण येथे हजर करण्यात आले आहे.

प्रस्तुत उल्लेखनीय कामगिरी मा. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), मा. शिवराज पाटील, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) व मा. निलेश सोनावणे सहा पोलीस आयुक्त, (शोध-१) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखा घटक-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सपोनि. संदिप चव्हाण, पोउनि. संजय माळी, पोहवा. विश्वास माने, बालाजी शिंदे, विलास कडु, बापुराव जाधव, पो.कॉ. मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे यानी यशस्वीपणे केलेली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत