BREAKING NEWS
latest

डोंबिवलीत मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेटचा मानपाडा पोलीसांकडून पर्दाफाश; एकजण अटकेत तर एक फरार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.०९ : डोंबिवलीत मसाज पार्लरच्या नावाने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा मानपाडा पोलीसांनी छापा मारून पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून पाच तरुणींची पोलीसांनी सुटका करून मसाज पार्लरचा मॅनेजर नितीन भुवड याला अटक केली आहे. मात्र मसाज पार्लर चालवणारा मुकुंद वाघमारे हा फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

डोंबिवली पूर्व येथील पेंढारकर कॉलेज परिसरात आर्किनिया इमारती मध्ये ऑर्चीड मसाज पार्लर मध्ये मसाज सेंटर च्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होणमाने यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होणमाने यांनी एक इसम पाठवून खात्री केली. या पार्लर मध्ये मसाज च्या नावाखाली देहव्यापार सुरू होता. एसीपी सुनील कुऱ्हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होणमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अविनाश वनवे यांच्या पथकाने मसाज पार्लरमध्ये अचानक छापा टाकला. या मसाज पार्लर मधून पाच तरुणींची सुटका केली व मसाज पार्लर चा मॅनेजर नितीन भुवड याला बेड्या ठोकल्या. तर मसाज पार्लर चालवणारा मुकुंद वाघमारे हा फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत