BREAKING NEWS
latest

डोंबिवली जिमखान्यात २३ ते ३१ डिसेबर दरम्यान रंगणार उत्सव २०२३' रंगतदार सोहळा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.१५ :  डोंबिवली जिमखाना येथील 'म्हैसकर स्पोर्ट्स सेंटर' जी डोंबिवलीतील अग्रगण्य संस्था असून १९८३ सालापासून आजपर्यंत कार्यरत आहे ज्याची सभासद संख्या २००० च्या आसपास असून सभासदांबरोबरच विध्यार्थी सुद्धा स्विमिंग, क्रिकेट, बॅडमिंटन कोचिंग घेऊन पुढे जात आहेत व 'सर्वासाठी सर्व काही' म्हणत २५ वर्षानंतरही तोच उत्साह आणि उमेद घेऊन रंगणारा डोंबिवलीकरांसाठी आनंदाची आणि खरेदीची पर्वणी घेऊन येणारा डोंबिवली जिमखाना आयोजित 'उत्सव २०२३' यंदा २३ ते ३१ डिसेंम्बर या दरम्यान जिमखाण्याच्या पटांगणावर होणार आहे. यंदाचे 'उत्सव २०२३' चे २६ वे वर्ष असूूून मागील वर्षी उत्सवचा 'रौप्य महोत्सव' अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. 

यंदा जिमखाना आणि उत्सवचे खजिनदार आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व मधुकर चक्रदेव यांच्या आकस्मिक निधनामुळे काहीशी दुःखाची किनार या उत्सवावर असली तरीही 'शो मस्ट गो ऑन' या उक्ती प्रमाणे स्टॉल धारकांनी वर्षभरापासून केलेली गुंतवणूक आणि उत्सवाच्या तयारीसाठी मधुकर चक्रदेव यांनी अखेरच्या क्षणापर्यंत केलेली उत्साहाने मेहनत यामुळे यंदाचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.
वेगवेगळ्या उत्पादकांनी आपल्या उत्पादनासाठी योग्य आणि साजेशी बाजारपेठ म्हणून उत्सवला कायमंच वरचे स्थान दिले असून यंदाही त्यांचा उत्साह तसाच आहे 'उत्सव २०२३' मधील १४० स्टॉलचे बुकिंग झाले असून खरेदी बरोबरच अम्यूझमेंट पार्क, फूड स्टॉलचा आनंद देखील डोंबिवलीकरांना घेता येणार आहे. यंदाचे एक वेगळे खास  आकर्षण म्हणजे 'श्रीराम मंदिराची प्रतिकृत्ती' साकारण्यात येणार आहे ज्याची लांबी रुंदी २५ x ५० फूट असून उंची ४० फूट आहे. जेणेकरून भाविकांना प्रत्यक्ष आत जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता येईल. ह्याचे सर्व श्रेय 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार' ह्यांना दिले जाते.

डोंबिवलीतील नागरिकांना आनंदाची पर्वणी देणाऱ्या उत्सवची सुरुवात डोंबिवली जिमखान्याच्या वतीने १९९६ सालापासून करण्यात आली. सुईपासून ते घरगुती वापराच्या सर्व वस्तू आणि सौंदर्य प्रसाधनांपासून कपडे आणि दागिन्यांपर्यंत सर्व काही एकाच छताखाली मिळणाऱ्या मॉल संस्कृतीच्या आधीपासूनच उत्सवच्या छताखाली डोंबिवलीकर ही पर्वणी अनुभवत आहेत. विशेष म्हणजे या महोत्सवात मिळणाऱ्या अनेक वस्तू केवळ याच ठिकाणी मिळतात, यामुळेच प्रत्येक डोंबिवलीकर उत्स्वची आतुरतेने वाट पाहत असतात. २०२० साली कोरोनामुळे उत्सव सलग दोन वर्षे रद्द करावा लागला, मात्र त्यानंतर मागील वर्षी २०२२ मध्ये त्यापेक्षा कितीतरी उत्साहाने उत्सवचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले.

उत्सवच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न जिमखान्याच्या मैदानाच्या देखभाल दुरुस्तीसह विविध खेळाची मैदाने तयार करण्यासाठी खर्च केले जाते. मात्र त्याच बरोबर सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेऊन जिमखान्याने कोरोना काळात तब्बल दीड वर्ष जिमखान्याच्या मैदानाचा मोठा भाग 'कोरोना रुग्णालय' उभारण्यासाठी एक रुपया सुद्धा न घेता कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाला उपलब्ध करून दिला. उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे आतील स्टॉलचे वर्षभर आगाऊ बुकिंग करत विक्रेते उत्सवातील मोक्याची जागा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. यंदाही उत्सवचे सर्व १४० स्टॉल बुक झाल्यामुळे ग्राहकांना खरेदीचा आनंद मनमुराद लुटता येणार आहे.

उत्सव २०२३ च्या व्यासपीठावरून डोंबिवलीतील विविध सांस्कृतिक संस्था, शाळांचे वि‌द्यार्थी विविध कलागुण सादर करणार आहेत. तर 'झीटीव्ही'चे लाडके कलाकार उत्सवच्या आठ दिवसांच्या कालावधीत प्रेक्षकांच्या, रसिकांच्या भेटीला येणार आहेत. सांस्कृतिक परंपरेबरोबरच सामाजिक भान जपताना पोलीसांच्या माध्यमातून 'सायबर गुन्हे' रोखण्याबाबत जनजागृतीपर पथनाट्य या व्यासपीठावरून सादर केले जाणार आहे. डोंबिवली आणि परिसरातील एक लाख शालेय विध्यार्थ्यांना 'उत्सव २०२३'चे मोफत पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कल्याण लोकसभेचे लाडके खासदार 'डॉक्टर श्रीकांत शिंदे फाऊंडेशन'ने उत्सवचे मुख्य प्रायोजकत्व स्विकारले असून सालाबादप्रमाणे 'डोंबिवलीकर एक सास्कृतिक परिवार' गेली १३ वर्षे उत्सवचे प्रायोजक आहेत. देशभरात नावाजलेल्या पितांबरीने दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्सवला सहप्रयोजकत्व दिले आहे असे जिमखान्याचे पदाधिकारी पर्णाद मोकशी (मा. सचिव), डॉ. प्रमोद बाहेकर (उपाध्यक्ष), आनंद डीचोलकर (खजिनदार)  व शेखर पाटील (सह-सचिव) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत