डोंबिवली दि.२१ : महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना (रजि) यांच्या वतीने कष्टकरी नाका कामगारांना गुरुवार दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायं ६ वेळेत २८३ हुन अधिक नाका कामगारांना सेफ्टी कीट व अत्यावश्यक सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व नाका कामगारांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर देखील संपन्न झाले.
संघटनेच्या प्रयत्नातून नाका कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक शिष्यवृती १ ली ते ७ वी पर्यंत २५०० रूपये, ८ वी ते १० वी ५ हजार रुपये, ११ वी १२ वी १० हजार रुपये, महाविद्यालयीन पदवी प्रथम ते तृतीया वर्ष २० हजार रुपये, इंजिनियरिंग शिक्षणाकरिता प्रती वर्षी ६० हजार रुपये, वैद्यकीय शिक्षण करिता प्रती वर्षी १ लाख रुपये, कामगारांच्या स्वतःच्या विवाहाकरिता ३० हजार रुपये, कामगारांच्या मुलींच्या विवाहाकरिता ५१ हजार रुपये, कामगारांच्या पत्नी प्रसूती नॉर्मल १५ हजार रुपये व सिजरिंग करिता २० हजार रुपये तसेच कामगार काम करत असताना निधन झाल्यास त्यांच्या वारसांना ५ लाख रुपये, काम करत असताना अपंगत्व आल्यास २ लाख रुपये, कुटुंबातील ४ व्यक्तींना गंभीर आजाराकरिता १ लाख रुपये आर्थिक सहाय्य केले जाते. अशा विविध ३० योजनांवर संघटना कामकाज करते. या सर्व शासकिय योजनांचा लाभ घेण्याकरिता कामगारांनी संघटनेच्या ऑफिसमध्ये येऊन आपली नोंदणी करून घ्यावी असे संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ म्हणाले तसेच कामगारांना लाभ मिळवुन देण्याकरीता संघटना अहोरात्र मेहनत करते.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन मा.नितीन गीते (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली रामनगर), जयवंत चौधरी ('फ' प्रभाग क्षेत्र अधिकारी अनधिकृत विभाग), माणिकराव त्रिंबक उघडे (संस्थापक अध्यक्ष रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ, आर पी आय नेते), अजय पौळकर (काँगेस नेते) हे मान्यवर उपस्थित होते. मा. लक्ष्मण माणिकराव मिसाळ (संस्थापक अध्यक्ष), नामदेव भानुसे (युवाध्यक्ष), विश्वनाथ रेवगडे (खजिनदार), वंदना जाधव (महिला शहराध्यक्ष), राणा शेठ (केंद्रिय कमिटी सदस्य), कारभारी रेवगडे (कार्यालय प्रमुख), रामेश्वर शेजुळ (नाका अध्यक्ष), रामचंद्र वाघ (डोंबिवली उपाध्यक्ष) चंद्रकांत गायकवाड (कुर्ला जिल्हाध्यक्ष) इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतोनात मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा