डोंबिवली: दि. २२/१२/२०२३ रोजी गुन्हे शाखा, घटक-३. कल्याणचे पो.हवा. दत्ताराम भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, डोंबिवली पूर्वेकडील ठाकुर्ली रोड येथील हॉटेल बंदिश पॅलेस जवळच्या चौकात, डोंबिवली पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार असलेला सराईत गुंड आतिष राजु गुंजाळ हा या ठिकाणी हातात घातक चॉपर घेवुन लोकांत दहशत निर्माण करीत आहे. अशा खात्रीशीर मिळालेल्या बातमीवरून गुन्हे शाखा, घटक-३. कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाई करून तडीपार असलेला सराईत गुंड आतिष राजु गुंजाळ (वय: २४ वर्षे) रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शेलारनाका, डोंबिवली (पुर्व) यास सायंकाळी ७:३० वाजता त्याच्या हातात असलेल्या घातक चॉपरसह ताब्यात घेवुन त्याच्या विरूध्द डोंबिवली पोलीस ठाणे गु.र.नं. ४८५/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ (१) (अ) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५. १४२ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद देवुन गुन्हा दाखल करून आरोपी व मुद्देमाल डोंबिवली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला. तडीपार सराईत गुंड याच्यावर डोंबिवली पोलीस ठाण्यात किडनॅपींग, घातक शस्त्र जवळ बाळगुन गंभीर दुखापत करणे, अंमली पदार्थ विक्री करणे अशा प्रकारचे यापुर्वी एकुण ०५ गुन्हे दाखल आहेत.
तसेच डोंबिवली पूर्वेकडील जिमखान्याजवळ डोंबिवली व टिळकनगर पोलीस ठाण्याचे रेकॉर्डवरील तडीपार असलेला सराईत गुंड गणेश अशोक अहिरे हा या ठिकाणी कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याचे उदद्देशाने वावरत आहे अशी खात्रीशीर मिळालेल्या बातमीवरून गुन्हे शाखा, घटक-३. कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाई करून तडीपार असलेला सराईत गुंड गणेश अशोक अहिरे (वय: २२ वर्षे) रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शेलारनाका, डोबिवली (पुर्व) यास सायंकाळी ८:१० वाजता ताब्यात घेवुन त्याचे विरूध्द टिळकनगर पोलीस ठाणे गु.र.नं. ३०२/२०२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद देवुन गुन्हा दाखल करून आरोपीस टिळकनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तडीपार सराईत गुंड याच्यावर डोंबिवली व टिळकनगर पोलीस ठाण्यात चोरी, घातक शस्त्र जवळ बाळगणे, गंभीर दुखापत करणे अशा प्रकारचे यापुर्वी एकुण ०३ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे मा शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, व मा.निलेश सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध - १) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे व.पो. निरी. नरेश पवार, पो.नि. राहुल मस्के, सपोनिरी. संदिप चव्हाण, पो.उपनिरी. संजय माळी, पो.हवा. दत्ताराम भोसले, बापुराव जाधव, बालाजी शिंदे, रविंद्र लांडगे, किशोर पाटील, सचिन वानखेडे, अनुप कामत, विनोद चन्ने सर्व नेम. गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यांनी केलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा