BREAKING NEWS
latest

चाकुचा धाक दाखवुन जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा, घटक - ३ कल्याण पोलीसांनी केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : फिर्यादी रणजीत शंकर गलांडे रा. रूम नं. ०५, कालीकामाता चाळ, बंदीश हॉटेल जवळ, डोंबिवली (पुर्व) हा दि. १२/१२/२०२३ रोजी रात्रौ ०८:१५ वा. च्या सुमारास शेलार नाक्यावरील 'फेमस मटण शॉप' येथुन घरी जाण्याकरीता रिक्षात बसले असताना आरोपी सनी ऋषीपाल तुसांबड याने व त्याचा साथीदार अक्षय अहिरे यांनी फिर्यादी यांच्या पोटाला चाकु लावुन 'चिल्लाया तो काट डालेंगे' असे म्हणुन दोन्ही आरोपी यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करून फिर्यादी यांचा १०,०००/रूपये किंमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन घेवुन त्यांना चाकुची भिती दाखवुन फिर्यादी यांचे मोबाईल मधील 'गुगल पे' चा युपीआय आयडी पिन नंबर मागुन घेतला व आरडा ओरडा केला तर मारण्याची धमकी दिली. त्यानंतर नमुद दोन्ही आरोपी यांनी फिर्यादी यांच्या 'गुगल पे' च्या आधारे बँक खात्यातुन १२,१००/- रू काढुन घेतल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ४८०/२०२३ भादंवि कलम ३९४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण कडून समांतर तपास करीत असताना दि. १९/१२/२०२३ रोजी पोलीस हवालदार विश्वास माने व पोलीस कॉन्स्टेबल  गुरूनाथ जरग यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सपोनि संदिप चव्हाण, पोउपनि संजय माळी व पथकाने सापळा रचुन बावन चाळ, रेल्वे मैदानाजवळ, डोंबिवली पश्चिम येथून वर नमुद गुन्ह्यातील आरोपी सनी ऋषीपाल तुसांबड (वय: १९ वर्षे) रा. वाल्मीकी वस्ती, शेलार चौक, त्रिमुर्ती नगर, डोंबिवली (पुर्व) यास गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी हा अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरूध्द विविध पोलीस ठाण्यात बरेच गुन्हे दाखल आहेत. नमुद आरोपी यास पुढील कारवाई करीता डोंबिवली पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पंजाबराव उगले साो, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील साो, मा. सहा. पोलीस आयुक्त निलेश सोनावणे साो, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोनिरी. राहुल मस्के, सपोनिरी. संदिप चव्हाण, पोलीस उप निरीक्षक संजय माळी, पोहवा. विश्वास माने, बापुराव जाधव, पोकाँ. गुरूनाथ जरग, गोरक्ष शेकडे यांनी यशस्वीरीत्या केली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत