BREAKING NEWS
latest

शिवसेना युवानेते दीपेश म्हात्रे यांच्या आश्वासनानंतर फेरीवाला आमरण उपोषणाला स्थगिती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.१८ : डोंबिवली पुर्वेला ५० वर्षा पेक्षा अधिक काळ असलेल्या भाजी व फळ मार्केटला शिवसेना युवा नेते दीपेश म्हात्रे यांनी भेट दिली, नुकतीच महानगरपालिकेने फेरीवाल्यांना बसण्याकरीता बंदी आणली होती, त्यामुळे सदर भागातील भाजी व फळ विक्रेत्यांनी आमरण उपोषण पुकारले होते.  या फेरीवाल्यांनी नुकतीच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. खासदार महोदयांनी महानगरपालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्याशी संपर्क साधून सदर फेरीवाल्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये असे आश्वासित केले होते.
आज उपोषणाला बसलेल्या शिवगर्जना भाजी व फळ संघाच्या कार्यकर्त्यांची दीपेश म्हात्रे यांनी  भेट घेतली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, काही दिवसातच महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात त्यांची बैठक बोलाविण्यात येणार असून फेरीवाल्यांनी पुकारलेले आमरण  उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करावे अशी दीपेश म्हात्रे यांनी विनंती केली व त्यांनी मान्य ही केली. 
यावेळी सर्व फेरीवाल्यांना न्याय मिळवून देणार असे दीपेश म्हात्रे यांनी  आश्वासित केले व त्यांच्या सोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व स्वतः दीपेश म्हात्रे  त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. यावेळी सोबत युवासेनेचे सोनू सुरवसे व कार्यकर्ते उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत