BREAKING NEWS
latest

शिवसेना मा.नगरसेवक, कल्याण तालुका प्रमुख, कल्याण जिल्हा समन्वयक महेश पाटील यांचा वाढदिवस ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.०३ : शिवसेना शिंदे गटातील डोंबिवलीतील सागांव येथील महेश पाटील प्रतिष्ठानचे माजी नगरसेवक कल्याण तालुका प्रमुख तसेच कल्याण जिल्हा समन्वयक महेश पाटील यांचा वाढदिवस आज सायंकाळी साडेसात वाजता ज्येष्ठ नागरिकांसोबत केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महेश पाटील यांना त्यांच्या वाढदिवसाच्या  शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर त्यांचे असंख्य कार्यकर्ते तसेच मित्रपरिवार हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे महेश पाटील यांनी  आपल्या वाढदिवशी दिनी 'महेश पाटील प्रतिष्ठाण' तर्फे सकाळी ७.३० वाजल्यापासून खिडकाळी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी अल्पोपहार ठेवला होता. सकाळी ८.३० वाजता मलंगगड रोड येथे अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सकाळी १०.००  वाजता महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वॉर्ड क्र.८३ च्या माजी नगरसेविका सायली संजय विचारे यांच्या ऑफिसमध्ये  गोग्रासवाडी, पाथरली येथे 'आयुष्यमान भारत कार्ड' आणि 'आधार कार्ड' शिबीर भरविण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी २ आयुर हॉस्पीटल, स्काय वन टॉवर, जिमखाना रोड, कल्याण येथेही मेडीकल चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२.३० वाजता खोणी येथील म्हाडा कॉलनी येथे जेवणाचे वाटप करण्यात आले. तसेच डोंबिवली पूर्वेला स्टेशन परिसरातील कैलास लस्सी समोर देखील जेवणाचे वाटप करण्यात आले. तिथून दुपारी १ वाजता डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर इस्पितळातील रूग्णांना तसेच आश्रम मध्ये फळे वाटण्यात आली. सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ नागरिक कट्टा येथे वृद्धांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व सायंकाळी ६.३० वाजता एमआयडीसी येथील ज्येष्ठ नागरिक कट्टा येथे ज्येष्ठ नागरिकांसोबत केक कापण्यात आला. 
येणाऱ्या सर्व शुभेच्छुकांसाठी जेवणाची सोय म्हणून बुफे डिनर ठेवण्यात आला होता. याप्रसंगी त्यांची बहीण तसेच मा.नगरसेवक डॉ. सुनीताताई पाटील, समाजसेवक सुजित नलावडे, विजय बाकाडे, संजय विचारे, सायली विचारे, सुरज परदेशी, प्रदीप पाटील, कुणाल पाटील, सिकंदर मकाणी, बंडू पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विवेक पोरजी यांनी केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत