BREAKING NEWS
latest

डोंबिवलीत 'जेनेरिक आधार' मेडिकल दुकानाचे उद्घाटन समारंभ संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२ डिसेंम्बर : डोंबिवलीतील कल्याण-शीळ रोड येथील भारत पेट्रोल पंपासमोर, मानपाडेश्वर मंदिराशेजारी शॉप नंबर.५, शिव मल्हार आरकेड येथे आज रोजी स्वस्त औषध विक्रीच्या 'जेनेरिक आधार' या मेडिकल दुकानाचे उद्घाटन 'जेनेरिक आधार चे संशोधक तथा संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या हस्ते आज फीत कापून व दीप प्रज्वलित करून पार पडले.
'जेनेरिक आधार' च्या माध्यमातून सकारात्मकतेने आपण लोकांपर्यंत थेट पोचतोय आणि डोंबिवलीतील डॉक्टर सुद्धा उपस्थित असून सगळे एक एक पाऊल पुढे येऊन लोकांना आरोग्य सेवा आपण कशी कमीतकमी दरात देऊ शकतो त्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु त्यांचं योगदान देतात आणि 'जेनेरिक आधार' च्या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये जे रुग्ण आहेत त्यांच्यापर्यंत थेट जेनेरिक औषधं ब्रँडेड औषधांच्या तुलनेत ८० टक्के स्वस्त दरात रुग्णांना उपलब्ध करून देत आहोत. जसे ब्रँडेड औषध जर १०० रुपयाला मिळत असतील तर 'जेनेरिक आधार'च्या नावाच्या औषध गोळ्या २० ते ३० रुपयाला उपलब्ध करून देत आहोत ज्याने औषधाचे जे बिल आहे ते मोठ्या प्रमाणात यामुळे कमी होत जाते. गावागावांमध्ये जसे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र येथे छोट्या छोट्या गावांमध्ये जेनेरिक आधार चे मेडिकल स्टोअर आम्ही पोहोचोवतोय जिथे मोठ्या कंपनी तर सोडाच तिथे चांगलं मेडिकल स्टोअर सुद्धा नाहीये त्या कानाकोपऱ्यात जेनेरिक आधार च्या फ्रॅंचायझीस आम्ही उघडतोय व उद्घाटन करतोय जसं महाराष्ट्रात वसई, विरार, पालघरचे आदिवासी पाडे तिथेही 'जेनेरिक आधार'चे फ्रॅंचायझी कार्यरत आहेत त्यामुळे रुग्णांना आणि जनतेला खरं तर जेनेरिक आधार हा एक आर्थिक आधार बनला आहे असे अर्जुन देशपांडे यांनी अर्जुन वझे यांना या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देताना प्रसिध्दी माध्यमांशी बोलले.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित डॉ.उल्हास गोळे म्हणाले की प्रिस्क्रिप्शनकाराला खूप चांगली संधी उपलब्ध झाली असून रुग्णांना ब्रॅण्डेड पेक्षा कमी किमतीत जे दीर्घकालीन (क्रॉनिक) आजार आहेत जसे मधुमेह, रक्तदाब इत्यादी ज्याची औषधे रुग्णांना नियमित घ्यावी लागतात त्या रुग्णांना खूप चांगला आर्थिक लाभ मिळेल. कमी किमतीत महिन्याचा त्यांचा जो काटकसरीचे अंदाजपत्रक (बजेट) आहे त्यात त्यांना या जेनेरिक औषधाच्या माध्यमातून आणि जवळपास मिळत असल्यामुळे खूप बचत होईल आणि आम्हाला प्रिस्क्राईब करायलाही सोपं जाईल. 

'जेनेरिक आधार' चे डोंबिवलीतील फ्रॅंचायझी राकेश वझे यांनी गरीब रुगणांची सेवा करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संशोधक तथा संस्थापक अर्जुन देशपांडे यांचे आभार मानले. ब्रँडेड कंपन्यांची औषधे महाग असल्याने मध्यमवर्गीय गरीब जनतेला ती परवडत नव्हती तर आम्ही  त्यांच्या महिन्याचा औषधांचा खर्च या 'जेनेरिक आधार' स्वस्त औषध विक्री च्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले. उद्घाटनाला राकेश वझे त्यांचे संपूर्ण कुटुंब तसेच जयेश माळी, चांगदेव वझे उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत