डोंबिवली: वैयक्तिक आयुष्यात अथवा व्यावसायिक घडामोडींमध्ये काही मूल्य ठरवली गेली आहेत. नैतिक मूल्य, विचारांची देवाणघेवाण, ह्या सारख्या अनेक गोष्टींची मूल्य तत्व ठरवली गेली आहेत, ह्यासाठी परिसंवाद साधणे गरजेचे आहे. 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित जन गण मन इंग्लिश सेकंडरी स्कूल आणि विद्यामंदिर, ज्युनिअर कॉलेज तसेच वंदे मातरम् महाविद्यालयाचे सर्वेसर्वा डॉ. राजकुमार कोल्हे यांनी नव वर्षाच्या पूर्वसंध्येला अशाच परिसंवादाचे आयोजन जे एम एफ मधुबन वातानुकुलीत सभागृहात आयोजित केले होते. येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांशी परिसंवाद साधण्यास सुरुवात केली. नवीन वर्ष अजुन उज्वल कस करता येईल त्याबद्दल काही खास टिप्पणी दिल्या.
ह्या परिसंवादमध्ये अनेक विषय मांडले गेले. व्यावसायिक आणि वैयक्तिक मूल्य वेगवेगळ्या प्रकारे कशी जपली गेली पाहिजेत ह्याचे मार्गदर्शन करून चर्चासत्र आयोजित केले. परिसंवादाची सुरुवात ही " वेळेचे आयोजन " कसे असावे ह्याबद्दल संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आयुष्यात प्रत्येक क्षणाला वेळेचे किती महत्व आहे हे समजावून सांगितले. दिलेली वेळ पाळणे व काम पूर्ण करणे म्हणजेच आपल्या यशाची ती पहीली पायरी आहे असे सांगून वेळेला महत्व द्या, काळ आणि वेळ दोन्ही अशा गोष्टी आहेत की आपण त्यांना महत्व दिले, त्यांचा आदर केला तर आपल्या आयुष्यात म्हणा अथवा व्यावसायिकते मध्ये भरभराट होते. शब्दांमध्ये खूप मोठी ताकद आहे, एखाद्याला शब्द देणे व दिलेला शब्द पाळणे ह्यासारखे दुसरे पुण्य नाही असे सांगून त्याचबरोबर डॉ. राजकुमार कोल्हे यांनी, आपले 'शब्द' जपून ही वापरायला पाहिजे असे सांगून, ज्या प्रमाणे भात्यातून सोडलेला बाण हा परत येऊ शकत नाही त्याच प्रमाणे तोंडातून बाहेर पडलेला शब्द देखील परत येऊ शकत नाही असे उदाहरण देऊन कोणाशीही बोलताना शब्द नीट जपून वापरा व दिलेला शब्द मोडू नका असे सांगितले.
शिस्तप्रिय माणूस हा नेहमीच सर्वांना प्रिय असतो. 'ज्याचा अंगभूत शिस्त त्याचे जीवन मस्त' असे सांगून व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवर शिस्तीचे फार महत्व आहे. 'कमिटमेंट ' म्हणजेच वचनबद्धता, सर्वप्रथम आपण स्वतःशी किती वचनबद्ध आहोत हे पडताळून पाहणे अतिशय गरजेचे आहेत. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात प्रथम आधी स्वतःशी नंतर दुसऱ्याशी वचनबद्ध असणे म्हणजे ही यशाची दुसरी पायरी आहे. आपण ज्या संस्कारांनी लहानाचे मोठे झालो आहोत, अशा सांस्कृतिक स्तरावर आपण काहीतरी नवीन करून देशाचे प्रतिनिधित्व करावे. एखाद्याला गृहीत धरणे हा मानवी स्वभाव आहे .प्रत्येक बाबीत समोरच्या व्यक्तीला गृहीत धरणे म्हणजे एक प्रकारे त्या व्यक्तीवर केलेला अन्यायच आहे असे सांगून डॉ. कोल्हे यांनी सत्यापित गृहीत धरू नका व आपल्याला देखील कुणी गृहीत धरेल असे वागू नका अशी शिकवण दिली.
मानवी स्वभावानुसार प्रत्येकाची वृत्ती (ऍटीट्युड) ही वेगळी असते. काहीवेळा त्या वृत्तीमधून गर्व, अहमपणा दिसून येतो, तर काही वृत्तिमधून शालीनता, प्रसन्नता, समाधानी वृत्ती दिसून येते. शेवटी ह्यातून निवडायचं तुम्हाला आहे, चांगले काय वाईट काय हे तुम्हालाच पडताळून ते आत्मसात करायचं आहे असे सांगून दिलेल्या कामाचा मोबदला हवा असेल तर वेळेचे नियोजन, वृत्ती, दिलेला शब्द पाळणे, शिस्त, वचनबद्ध असणे हे आणि अशा प्रकारचे चांगले गुण असणे अत्यावश्यक आहे. यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही आणि त्यासाठी अशा गोष्टींची देखील पुरवणी असणे गरजेचे आहे.
ह्या परिसंवादात साधारण १०० पेक्षाही जास्त शिक्षक व २०० पेक्षाही जास्त विध्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला होता. प्रक्षेपण यंत्रनाद्वारे (प्रोजेक्टर) अनेक मोठ्या व्यक्तीची चित्र फिती दाखवून यशाच्या गुरुकिल्ली चे रहस्य म्हणजेच सविस्तर सांगितलेल्या मुद्द्याचे अंगभूत गुणधर्म ज्या व्यक्तींमधे आहेत त्या ह्या सर्व मोठ्या व्यक्ती होत. वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक, आणि व्यावसायिक स्तरावर आपले झेंडे ज्यांनी गाढले आहेत अशा थोर व्यक्ती. सहभागी झालेल्या परिसंवादामध्ये अनेकांनी आपले प्रश्न मांडले व त्या प्रश्नांचे योग्यपणे निरसन डॉ. कोल्हे यांनी करून दिले. परिसंवाद कार्यक्रमाच्या शेवटी ब्रम्हाकुमारीज डोंबिवली शाखा याच्या कडून खेळाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते त्यातही सर्व उपस्थित सहभागींनी गेम्स खेळून आनंद घेतला. संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे व सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन प्रेमाचे प्रतीक म्हणून 'जे एम एफ' संस्थेतर्फे नवीन वर्षाची भेटवस्तू देऊ केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा