BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना 'बिंगो सर्कस' ची मेजवानी..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

डोंबिवली दि.१७ : "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा.." खरोखरंच या उक्ती प्रमाणे आज सर्वच लहान, पण मोठे ही लहानच झाले होते व आपल्या बालपणीची सर्कस पाहिलेल्या आठवणी ताज्या करत प्रत्यक्ष पाहून सुखावून गेले. 'जे एम एफ' संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आजचा १७ डिसेंबर  रविवार चा दिवस सगळ्यांनाच आनंददायी असा करून दिला. . 'जे एम एफ' संस्थेच्या अध्यक्ष महोदयांनी आपल्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालक वर्गासाठी कल्याण येथील बैल बाजार येथे सुरू असलेल्या 'बिंगो सर्कस' च्या  विशेष मोफत शो चे आयोजन केले होते. जवळपास ७०० पासेस विध्यार्थी आणि पालक वर्गाला सर्कस पाहण्याकरिता दिले गेले होते. सर्वच पालक वर्गासाठी व विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करून संपूर्ण सर्कस चे दालन केवळ पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आयोजित करून ठेवले होते. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी शाळेच्या बस ची सुविधा देखील केली होती. 
सकाळी १० ते १२ या कालावधीत सर्वांनी 'बिंगो सर्कस' चा विशेष शो बघण्याचा आनंद घेतला. साधारण सर्वजण मिळून ७०० च्या वर पालक, विद्यार्थी या शो करिता आवर्जून उपस्थित होते. संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी 'बिंगो सर्कस' चे मालक श्री.चव्हाण व व्यवस्थापक श्री.पिल्ले यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा भेट दिली, त्याच बरोबर सर्कशीतील काम करणारे सर्वच ५० च्या वर कलाकारांचे देखील जान्हवी कोल्हे व श्री व सौ कोल्हे दांपत्यानी त्यांचा सत्कार केला. सर्कस म्हणजे आनंद देणारा खेळ आहे असे सांगून, हा खेळ बघताना जसा आनंद मिळतो तसेच ह्या खेळात 'बॅलेन्स' म्हणजेच समतोल कसा साधला पाहिजे हे शिकणे फार महत्वाचे आहे असे सांगून संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपले मत व्यक्त केले. कोणत्याही एका व्यक्तीमुळे खेळ खेळता येत नाही तर त्यासाठी समूह सहकार्य असणे फार गरजेचे असते हे दिसून आले असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले.
एकंदरीत सर्वच उपस्थितांनी व विशेषतः मुलांनी सर्कस बघण्याचा आणि तो मनमुरादपणे अनुभवल्याचा आनंद घेतला. सर्वच मुलांनी सर्कशीच्या रिंगणात जाऊन मिकी माउस, डोरेमॉन व जोकर बरोबर उड्या मारून, नाच करून धमाल केली. आणि पॉपकॉर्न चा आस्वाद देखील घेतला. १० ते १२ ची वेळ  म्हणजे नजर खिळून ठेवणारा कालावधी होता. सर्वच विद्यार्थी पालकांनी रविवार चा दिवस आनंददायी घालवला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत