BREAKING NEWS
latest

'दीपेश म्हात्रे फाउंडेशन' च्या तर्फे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

डोंबिवली दि.१७ : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तसेच युवसेनेच्या 'दीपेश म्हात्रे फाउंडेशन' तर्फे आज रविवार  दिनांक १७ डिसेंम्बर रोजी डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथील सह्याद्री कार्यालयासमोरील मैदानात सकळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोफत तपासणी व ऑपरेशन ची देखील सुविधा देण्यात येणार होती. त्यात हृदय रोग तपासणी, डोळे तपासणी, गुडघा प्रत्यारोपण, रक्तदाब व मधुमेह तपासणी, ऍंजिओग्राफी, मोतीबिंदू ऑपरेशन, साधारण तपासणी, किडनी स्टोन ऑपरेशन, बायपास सर्जरी, ईसीजी तपासणी, मोफत चष्मा वाटप, मधुमेह तपासणी तसेच मधुमेहावर मोफत औषधांची देखील  सुविधा देण्यात येणार होती म्हणून लोकांनी या महाआरोग्य शिबीराला खूप गर्दी केली होती.
दीपेश म्हात्रे यांच्याशी संवाद साधता त्यांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ जवळपास तीन ते साडेतीन हजार लोकांना मिळेल अशी अपेक्षा त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. या महाआरोग्य शिबिराला कल्याण लोकसभेचे लाडके व लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभणार होती. त्याबाबत दीपेश म्हात्रे यांना डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल येत्या २०२४ च्या निवडणुकीत कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचे नाव चर्चेला पुढे येत असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, कल्याण लोकसभेचं नाव जर महाराष्ट्रात किंवा देशात घेतलं जातंय तर त्याच्याबरोबर आमचे 'मीशन मॅन' डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी जे काम या लोकसभेमध्ये केलंय किंवा पूर्ण परिसरामध्ये म्हणजे भिवंडी लोकसभा, कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा मध्ये त्यांचं जे दूरदृष्टी ठेवून मोठ्या प्रमाणावर विकासाच्या दृष्टीने काम सुरू आहे तर ते काम बघता इथे कोणी दुसऱ्याने उभे राहण्याची हिम्मत करणार नाही असे मला वाटते असे ते प्रसिद्धी माध्यमांसमोर म्हणाले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत